राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेल्या कर्तृत्ववान महिलांना भोसरी येथे राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित

रोहित खर्गे, पुणे विभागीय संपादक

भोसरी दि १३ जानेवारी २०२१
भोसरी येथील लक्ष्यवेध स्पोर्ट्स फाऊंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भोसरी विधानसभा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती (युवा राष्ट्रीय दिन) च्या निमित्ताने राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन 12 जानेवारी 2019 रोजी राजमाता जिजाऊ महाविद्यालय लांडेवाडी भोसरी याठिकाणी करण्यात आले.

सदर कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रात ज्यांनी उत्तुंग अशी कामगिरी केलेली आहेत अशा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान भोसरी चे प्रथम आमदार मा. विलासराव लांडे पाटील, पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष मा.श्री संजोग वाघेरे पाटील पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा वैशालीताई काळभोर तसेच माजी महापौर मोहिनी विलास लांडे पाटील ,माजी नगरसेवक संजय वाबळे यांच्या शुभहस्ते डॉ. डी वाय पाटील स्कूल च्या प्राचार्या श्रीमती मृदुला महाजन ( सॉफ्टबॉल व क्रिकेट), मार इव्हानियस स्कूलचे क्रीडाशिक्षिका मनीषा श्रीनिवास जाधव (चपने), रेल्वेच्या खेळाडू अंजली वर्टी (दळवी) -( बास्केट बॉल) , कबड्डी मार्गदर्शिका सुधा खोले ,आंतरराष्ट्रीय योगा खेळाची खेळाडू कु. श्रेया शंकर कंधारे या पाच कर्तृत्ववान महिलांना पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन राजमाता जिजाऊ गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

त्याबद्दल सर्व पुरस्कारार्थी महिला भगिनींचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन या संपूर्ण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला उपाध्यक्षा कविता संदेश आल्हाट व कार्याध्यक्षा संगिता लक्ष्मण आहेर यांच्यावतीने करण्यात आले.
यावेळी भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे यांनी सर्व पुरस्कारी महिलांचे कौतुक करून त्यांच्या पुढील करकीर्दीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *