घरची भिंत अंगावर पडून जेष्ठ नागरिकाचा मृत्यू, एक जखमी

जुन्नर (वार्ताहर):- बोरी बुद्रुक (ता.जुन्नर) गावात सोमवार (दि.७) रोजी रात्री साडेनऊ वाजता पाऊस चालू असताना अचानक घराची भिंत अंगावर पडल्याने दादाभाऊ किसन बोरगे (वय- ७६) या जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर मिळालेली माहिती अशी की रात्री सुरू असलेल्या पावसामुळे बोरी गावठाणातील दादाभाऊ किसन बोरगे यांच्या स्वतः मालकीचे घर अंगावर पडून त्यात त्यांचा मृत्यू झाला. तर पत्नी लिलाबाई बोरगे या किरकोळ जखमी झाल्या.

घरात पत्नी व ते स्वतः असे दोघेच राहत होते.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर आणि त्यांच्या सहाका-यांनी घटनास्थळी भेट दिली येथील काही स्थानिक ग्रामस्थांनी दादाभाऊ बोरगे व त्यांच्या पत्नीला बाहेर काढले परंतु तोपर्यंत दादाभाऊ बोरगे यांचा म्रुत्यू झाला होता.

ग्रामपंचायत मिळकत नंबर ४३७ मध्ये पडलेले घर हे घरकुल विस्तार योजनेतून त्यांना मिळाले होते. सदर कच्चे घर २०x१२ या मापाचे दगड-विटा कौलारू पद्धतीने बांधकाम केले होेते. यामध्ये एकूण घराचे दीड लाख रुपये चे नुकसान झाले आहे.

सोमवारी रात्री बोरी येथे १२ मि. मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मंडळ अधिकारी नितीन चौरे यांनी सदर घटनेचा पंचनामा केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.