सोशल मीडियावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अश्लील भाषेत टीका

बातमीदार: रोहित खर्गे विभागीय संपादक

भाजप मोर्च्याच्या मनोज पाटील याने सोशल मीडियावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अश्लील भाषेत टीका केल्याची पोस्ट केल्याबद्दल त्याला अटक करण्याची युवा सेनेची मागणी

पिंपरी-चिंचवड भाजप युवा मोर्चाच्या मनोज पाटील ह्याने सोशल मीडियावर युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे व खासदार मा.सुप्रियाताई सुळे यांच्यावर अश्लील भाषेत टीका केल्याने युवासेना सचिव वरुण सरदेसाई, युवासेना विस्तारक सचिन बांगर, राजेश पळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हा युवा अधिकारी सुरज लांडगे, जिल्हा समन्वयक सचिन सानप, युवासेना जिल्हा समन्वयक जितेंद्र ननवरे, रूपेश कदम, अजिंक्य उबाळे, भोसरी विधानसभा अधिकारी कुणाल जगनाडे, पिंपरी विधानसभा युवती अधिकारी प्रतीक्षा घुले यांनी आक्रमक होऊन मनोज पाटील राहत असलेल्या वाकड, चिंचवड येथील सोसायटीच्या आवारात जोरदार निदर्शने केली.

तो काही दिवसांपासून जळगाव येथे आपल्या गावी गेल्याची माहिती मिळताच युवासेना पदाधिकाऱ्यांनी वाकड पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली असून त्या नराधमाला जळगाव येथून लवकरात लवकर अटक करून त्याच्यावर कठोर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तात्काळ अटक न केल्यास कायदा हातात घेऊन जोरदार आंदोलन करण्याचा इशाराही युवासेनेने दिला आहे.

याप्रसंगी विधानसभा चिटणीस अमित शिंदे, अविनाश जाधव, निलेश हाके, सागर शिंदे, प्रविण पाटील, अनिकेत येरुणकर, गौरव आसरे, गणेश सस्ते, नितीन बोंडे यांच्यासह पिंपरी-चिंचवड व भोसरीतील युवासेना पदाधिकारी व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपण केलेल्या चुकीच्या पोस्टमुळे अडचणीत आल्याचे दिसताच मनोज पाटील याने त्याच्या सोशल मिडीया अकाउंटवरील पोस्ट डिलीट करून माफीनाम्याची पोस्ट टाकली आहे.

त्याच्या या वृत्तीचा युवा सेना सेनेकडून जाहीर निषेध करण्यात येत आहे. तसे पत्