जुन्नर तालुक्यात आजपर्यंत ७८३ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी सुमारे ५२० रुग्ण उपचार घेऊन परतले घरी

जुन्नर तालुक्यात आज एकूण ४१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

शिरोली बुद्रुक येथे आज तब्बल ८ पॉझिटिव्ह रुग्ण

नारायणगाव (किरण वाजगे)
जुन्नर तालुक्यात आज तब्बल ४१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आजपर्यंत आढळलेल्या एकूण ७८३ रुग्णांपैकी ५२० रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत.
शिरोली बुद्रुक येथे आज आठ कोरणा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून नारायणगाव व वारूळवाडी मध्ये आज प्रत्येकी ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आज कोरोनामुळे ओतूर व खानगाव येथील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ वर्षा गुंजाळ यांनी दिली.

यामुळे जुन्नर तालुक्यांमध्ये निश्चितपणे चिंतेचे वातावरण पसरले आहे. गणेशोत्सवाची सुरुवात मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात झाली असताना श्री गणेश स्थापनेच्या दुसऱ्या दिवशी तालुक्यात तब्बल ४१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यामुळे पुन्हा चिंता वाढली आहे. गणेशोत्सवाची तयारी करण्यासाठी अनेक नागरिक वेगवेगळ्या दुकानांमध्ये गर्दी करताना दिसत आहेत. सर्व नागरिकांनी कोरोना वाढीच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग चे पालन करणे गरजेचे असून योग्य कारणासाठीच घराबाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

आज शिरोली बुद्रुक येथे आठ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून काळवाडी येथे चार, तर नारायणगाव वारूळवाडी, आळे, काटेडे, ओतूर येथे प्रत्येकी तीन तसेच बेल्हे व जुन्नर येथे प्रत्येकी दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून ओझर, उंब्रज नं. दोन, निरगुडे, आर्वी, आळेफाटा, धामणखेल, गोळेगाव, धालेवाडी-कारखाना, कुरण, ठिकेकरवाडी येथे प्रत्येकी एक असे एकूण आज ४१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न झाले आहेत.

विशेष म्हणजे गेल्या पाच दिवसात सुमारे १४५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण जुन्नर तालुक्यात निष्पन्न झाल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यात आज पर्यंत ७८३ पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली आहे. यातील सुमारे ५२० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर २२९ अँक्टीव रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत एकूण ३४ रुग्णांचा कोरोणा मुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ उदय गोडे व वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा गुंजाळ यांनी दिली.