भारत जोडो यात्रेत चेंगराचेंगरी, एक जण जखमी

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१५ नोव्हेंबर २०२२


काँग्रेसचे खासदार राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील आज नववा दिवस असून ही यात्रा वाशिम जिल्ह्यात दाखल झाली आहे. मात्र, सकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे चेंगराचेंगरीची घटना घडली. यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं आहे.  राहुल गांधी यांच्या या पदयात्रेला हिंगोली तालुक्यातील फाळेगाव फाटा येथून सुरुवात झाली आहे. आज दुपारी वाशिम तालुक्यातील बोराळा येथे विश्रांती तर रात्रीचा मुक्काम वाशिम येथे असणार आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *