घोडे पाटील यांचे निलंबन घोडे पाटील यांचे निलंबन

सहाय्यक पोलीस निरीक्षक घोडे पाटील यांचे निलंबन तर पोलीस नाईक हांडे सेवेतून बडतर्फ

किरण वाजगे (कार्यकारी संपादक)

नारायणगाव दि. १२

पाच लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी नारायणगाव पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकास निलंबित करण्यात आले असून पोलीस नाईकास सेवेतून बडतर्फ करण्यात आले असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे आज जाहीर केले.
नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील व पोलीस नाईक धर्मात्मा हांडे यांच्या वर मंगळवार दिनांक ११ ऑगस्ट रोजी नारायणगाव पोलीस स्थानकात लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या दोघांनाही आज राजगुरूनगर येथील सत्र न्यायालयात हजर केले असता या दोघांना न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, नारायणगाव येथील पोलीस स्टेशन मध्ये बोरी साळवाडी येथील व्यक्तीवर सावकारकी च्या पैशातून केलेल्या अपहरणाचा गुन्हा काही दिवसांपूर्वी दाखल आहे. या गुन्ह्याबाबत न्यायालयात लवकर दोषारोपपत्र सादर करण्यासाठी तसेच अपहरणाच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी व गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक न करण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक घोडे पाटील व पोलीस नाईक हांडे यांनी सात ऑगस्ट रोजी तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक दत्तात्रय भापकर, पोलीस निरीक्षक सुनील बिले व त्यांच्या पथकाने नारायणगाव येथे सापळा लावला होता दरम्यान पोलीस नाईक हांडे हे पैसे स्वीकारण्यासाठी आले नाहीत मात्र तक्रारदार याच्यासोबत घोडे पाटील व हांडे यांच्या मोबाईल वरून जे संभाषण झाले होते त्यावरुन पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी ११ ऑगस्ट २०२० रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला व घोडे व हांडे यांना अटक केली. आज बुधवार दि. १२ रोजी या दोघांना खेड सत्र न्यायालयात हजर केले असता या दोघांना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती पोलिस उपअधीक्षक दत्तात्रय भापकर व व पोलिस निरीक्षक सुनील बिले यांनी दिली.


या घटनेची तात्काळ दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे यांची खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले असून त्यांना तात्काळ निलंबित केले आहे तर पोलीस नाईक धर्मात्मा हांडे यांना सेवेतून बडतर्फ केले आहे.


दरम्यान याप्रकरणी घोडे व हांडे या दोघांवरही ही सारखाच गुन्हा दाखल असताना घोडे यांच्यावर निलंबनाची कारवाई तर हांडे यांच्यावर थेट बडतर्फीची कारवाई केल्यामुळे सर्व स्तरावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *