आंबोली प्रतिनिधी – विकास भालचिम
पूर शिरोली येथील अर्चना ही आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह जुन्नर येथील माजी विद्यार्थीनी अर्चना किसन दिघे (Bsc Agri) या विद्यार्थ्यांनीने श्रीम ए टी पवार गृहपाल यांच्या मार्गदर्शनाखाली अन लॉक लर्निंग चे माध्यमातून शिरोली आदिवासी या दुर्गम भागातल्या वस्तीमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
डोंगर कपारितली ती विरळ वस्ती कुठं पिण्याचा पाण्यासाठी दिवसभरातील वणवण तर कुठं भाकर पोटापाण्यासाठी स्थलांतरित मजूर,कुठं कुपोषित बालकांचा प्रश्नच. असे अनेक प्रश्न ज्वलंत आपले डोके वर करून असतांना ह्यात एका समस्येने आपली जागा पक्की केली ह्यातीलच दूरसंचार चे तीन तेरा,त्या मुळे जगाची संपर्क शून्य.आदिवासी साठी छोटेखानी बाजारपेठेची ठिकाण असल्याने कशीबशी आपली लाज टिकवून त्यानंतर सुरू होतो जगभरात कोरोना महामारीने मानवी जीवनावर धुमाकूळ घातलेला असल्याने सर्व शाळा महाविद्यालयांना आपत्कालीन सुट्या घोषित करणात आलेल्या आहेत.

अर्चना दिघे च्या या उपक्रमात सक्रिय सहभाग मुले गृहपाल ए टी पवार तसेच स्थानिक नागरिक व आदिवासी भागातून अर्चना हिचे अभिनंदन व कौतुक मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव करत आहे इतर विद्यार्थ्यांना प्रेनादायी असलेली अर्चना सध्या BSC AGRI मध्ये शिकत आहे ह्याच आशा अर्चना च्या या जिद्दीला आपला आवाज न्यूज नेटवर्क चा सलाम.