🏴 स्री अत्याचार विरोधात पिंपरी चिंचवड मध्ये आंदोलन

रोहित खर्गे, विभागीय संपादक

पिंपरी दि ३१ डिसेंम्बर, भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी चिंचवड येथे महाविकासआघाडी विरोधात, आपल्या राज्यातील स्त्रियांवरील वाढत्या अत्याचाराचा जाहिर निषेध डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे भाजयुमोच्या सर्व युवती कार्यकर्त्या व शहराध्यक्ष संकेत चोंधे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

संभाजीनगर (औरंगाबाद) येथे राष्ट्रवादीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष यांच्यावर नौकरीचे आमीष दाखवुन एका युवतीवर अज्ञात स्थळी नेऊन गाडीमध्ये अत्याचार व बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय, यावर राज्य सरकारने व पोलिसांनी त्वरीत कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.

जर त्वरीत कडक कारवाई करून अटक नाही झाली तर युवा मोर्चातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शहराध्यक्ष संकेत चोंधे व सरचिटणीस तेजस्विनी कदम यांनी दिला.

यावेळी युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सदस्या देवयानी भिंगारकर, युवती आघाडीतील प्रदेश युवती सहसंयोजिका सौ. वैशालीताई खाडे, चिटणीस मुक्ता गोसावी, पूजा आल्हाट, अंजली पांडे, सायली शहाणे, स्मिता रासकर, प्रियांका जाधव, चंद्रशीला बनसोडे, नयन पालवे, शुभांगी कसबे यांनी निषेध नोंदवला.

तसेच भाजयुमोचे प्रदेश सदस्य अजित कुलथे, सरचिटणीस दिनेश यादव, जवाहर ढोरे, दिपक नागरगोजे, गणेश जवळकर, उपाध्यक्ष प्रसाद कस्पटे, शिवराज लांडगे, मोहित बुलाणी, रामदास कुटे, जयदिप कर्पे, अतुल बोराटे, आदित्य कुलकर्णी, चिटणीस रवि जांभुळकर, प्रकाश चौधरी, मंगेश धाडगे, मंडल अध्यक्ष सन्नी बारणे, शिरीश जेधे, व्यापारी आघाडी संयोजक राजेश राजपुरोहित, क्रिडा संयोजक विवेक महाजन, सहसंयोजक प्रथमेश सकपाळ, सोशियल मीडीया संयोजक विक्रांत गंगावणे, विद्यार्थी आघाडी सहसंयोजक अनिकेत शेलार, वरद जोशी, तेजस मुळे, रूबेन सन्नी, सिद्धांत बिंगानीया आदि प्रमुख कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *