ओतूर, दि 4/6/2021
बातमी – प्रतिनिधी,दीपक मंडलिक, माळशेज
ओतूर शहरात वरील आळी येथे श्री अशोक काशिद गुरूजी यांच्या घरावर बसवलेल्या मोबाईल कंपनीच्या टाॅवरला मोठी आग लागली आहे. आगीचे उंच लोळ उठल्याने आजूबाजूला लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
.या अचानक लागलेल्या आगीचे कारण जरी समजू शकले नसते तरी कुठलीही जीवित हानी झाली नसल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले आहे,
दाट लोकवस्ती मध्ये किंवा बाजारपेठेमध्ये अशा प्रकारचे मोबाईल टॉवर लावण्यास प्रशासनाने व स्थानिक स्वराज्य संस्थेने परवानगी देऊ नये अशी मागणी जोर धरू लागल्याचे चित्र सध्या तरी दिसू लागले आहे…..