ओतूर येथील आण्णासाहेब वाघेरे महाविद्यालयात तब्बल 30 वर्षांनी भरला बीकॉम 1990 च्या बॅच चा वर्ग

रोहित खर्गे, विभागीय संपादक

ओतूर :- दि २५ डिसेंम्बर..
आज शुक्रवार दि २५ डिसेंम्बर रोजी तब्बल ३० वर्षाने व्हाट्सअप च्या माध्यमातून बीकॉम 1990 च्या बॅच चे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आज पार पडले.मोबाईल मुळे दुनिया फार जवळ आलीय असे बोलले जातेय याचाच प्रत्येय म्हणजे हा ग्रुप असेही म्हणता येईल. कारणही तसेच आहे, तब्बल ३० वर्षाने सगळे मित्र मैत्रिणी एकत्र जमवून स्नेहमेळावा घडवून आणणे तसे अवघडच.परंतु त्यातील ३ मित्रांनी पुढाकार घेऊन हा ग्रुप एकत्रित केला आणि त्यातूनच अतिशय कमी वेळेत सामजिक भान ठेवून 3 उपक्रमही या ग्रुप च्या माध्यमातून पार पडले. याच कॉलेजचे माजी विद्यार्थी हेमंत डुंबरे, रोहित खर्गे, व मंगेश डुंबरे यांनी ठरवले की आपल्या बॅच चा ग्रुप बनवायचा आणि त्याच दिवशी ग्रुप बनतो काय आणि सगळे मित्र त्यात एकत्रित करून ग्रुप चे नावही बी कॉम 1990 असे ठेवण्यात येते. या ग्रुप च्या माध्यमातून आतापर्यंत खूप सामजिक कामाला हातभार लागला याचा सर्वानाच अभिमान आहे. ग्रुप च्या माध्यमातून दिवाळीमध्ये आदिवासी समाज्यातील पाड्यावर जाऊन अँड सलीम पटेल यांच्या माध्यमातून राजू दिवटे हेमंत डुंबरे, मंगेश डुंबरे, रोहित खर्गे व ओतूर चे माजी सरपंच हभप गंगाराम डुंबरे यांच्या हस्ते दिवाळीचे फराळ वाटप व कपडे वाटप करण्यात आले. याच ग्रुप मधील एक होतकरू तरुण प्रवीण उर्फ बाबू पिंपळे यांचा कोरोनाकाळात दुर्दैवी घटना घडली त्यात त्याचा मृत्यू झाला तो गेला असे कोणालाही वाटत नव्हते पण म्हणतात ना काळ वाईट असतो या म्हणीप्रमाणे च दुःखद घटना घडली त्यात त्याचा मृत्यू झाला. आपल्यातील तरुण मित्र गेला कुटुंबाची सर्व जबाबदारी त्याच्यावर होती एक कर्ता माणूस गेल्याचे दुःख खूप वेदनादायक असते. त्या कुटुंबातील वेक्तीना आधार देण्याचे नव्हे तर उभारी देण्याचे काम या ग्रुप मार्फत झाले व त्यांच्या कुटुंबियांना ग्रुप तर्फे ६३००० रु ची भरभक्कम रक्कम जमा करून त्याच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आली होती व या ग्रुप ने माणुसकीचे दर्शन घडविले.

आणि आज शुक्रवार दि २५ डिसेंम्बर रोजी खूप दिवसांचे अथक प्रयत्न करून या ग्रुप चा स्नेहसंमेलन मेळावा आण्णासाहेब वाघेरे कॉलेज ओतूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. त्यासाठी पुणे , मुंबई, नाशिक, पालघर व तालुक्यात राहणारे ग्रुप मधील 50 सदस्य आवर्जून हजर होते.

कार्यक्रमाची सुरवात महाविद्यालयाच्या प्रागंणात कै. श्रीकृष्ण रामजी तांबे यांच्या पुतुळ्याला उल्हास पानसरे रोहित खर्गे यांच्या हस्ते सर्व सभासदांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.

त्यानंतर प्रवेशद्वारावर सदस्य नोंदणी व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सदस्यांना मास्क वाटप, हातावर स्यानेटायजर, करूनच आत प्रवेश देण्यात आला. स्वागतासाठी 11 वी च्या विद्यार्थिनींनी सुंदर रांगोळी काढून उपस्थितांची मने जिंकली. त्यांचा सत्कार ग्रुप च्या वतीने हेमंत डुंबरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात करताना या ग्रुप चे सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य माऊलीशेठ कुऱ्हाडे यांच्या हस्ते कै बा. रा घोलप यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर हेमंत डुंबरे पाटील, यांनी आपले प्रास्ताविक केले. मनोगत अँड सलीम पटेल यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश डुंबरे यांनी हाती घेतले व सगळ्यानी आपल्या बॅच चे जे सदस्य हयात नाहीत त्यांच्या साठी श्रद्धांजली वाहिली व नंतर ग्रुप मधील सदस्यांची ओळख परेड व आपले कॉलेज जीवनातील काही अनुभव मित्रांनी वेक्त केले. याचवेळी कॉलेज चे प्राचार्य डॉ.टी.एन.साळवे यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या.

ग्रुप च्या वतीने उपप्राचार्य डॉ.एस. एफ ढाकणे व सेवानिवृत्त सेवक विठ्ठल नाना डुंबरे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. दोघांनीही सत्काराला उत्तर देताना आपली मनोगत वेक्त केले व विठ्ठल नानांनी ऐतिहासिक नाटकाचे एक स्वगत सादर केले त्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. व कार्यक्रमाचे मध्यंतर झाले. ग्रुप चे सदस्य राजुशेठ दिवटे यांनी सर्वाना येथेच्छ सुमधुर भोजणाचा स्वाद दिला त्यालाही सर्वांनी दाद दिली. सर्वांच एकत्रित फोटोसेशन घेण्यात आले व परत उत्तरार्धाकडे जात असताना सर्व सदस्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी ग्रुप चे तीन हिरे प्रवीण परदेशी, मचिंद्र डुंबरे, व झियाउद्दीन पिंजारी, यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर कार्यक्रमाचे फोटो घेणारे तरुण मित्र ग्रुप चे सदस्य प्रदीप एरंडे व मंगेश डुंबरे यांचे चिरंजीवांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते घेण्यात आला. या कार्यक्रमाला महिला भगिनींची उपस्थितीती लक्षणीय होती. त्यातील दोन महिला मनीषा कासवा व शांता रोकडे यांनी आपल्या सुमधुर आवाजात गाणी गायली तेव्हा सर्वच सदस्य मंत्रमुग्ध झाले व समारोपाकडे जाणाऱ्या कार्यक्रमाला रंगत आणली.

ग्रुप तर्फे आपण ज्या महाविद्यालयात शिकलो त्याचे काहीतरी देणं लागतो त्याचे ऋण म्हणून रोख रक्कम रु 5001 आमच्या ग्रुप चे सदस्य परंतु महाविद्यालयात सेवा करणारे हेमंत डुंबरे यांच्याकडे माऊलीशेठ कुऱ्हाडे यांच्या शुभहस्ते सुपूर्द करण्यात आली. भविष्यात ग्रुप च्या माध्यमातून सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल असे जाहीर केले. व यानंतर चे स्नेहसंमेलन आळेफाटा या ठिकाणी होईल असे राजू दिवटे यांनी जाहीर केले. सर्वांचे आभार उल्हास पानसरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *