अजित पवार यांची राष्ट्रवादीत घुसमट, आमच्यासोबत आले तर आनंदच; दीपक केसरकरांची पवारांना ऑफर

२६ डिसेंबर २०२२


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार नुकतेच पत्रकारांवर भडकले होते. कारण पत्रकारांनी त्यांना शरद पवार यांच्याविषयी एक प्रश्न विचारला होता. जयंत पाटील यांना विधानसभेत निलंबित करण्यात आल्यानंतर अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेवर शरद पवार नाराज असल्याच्या चर्चा होत्या. या चर्चांबाबत अजित पवारांना प्रश्न विचारला असता ‘मी दुधखुळा नाही. विरोधी पक्षनेत्याचं काम काय असतं ते मला कळतं’, असं अजित पवार म्हणाले होते. दुसरीकडे अजित पवार यांच्यावर महाविकास आघाडीतीलही आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत मंत्री दीपक केसरकर यांनी अजित पवारांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे.

दीपक केसरकर म्हणाले की, अजित पवार आमच्यासोबत आले तर आनंदच होईल. राष्ट्रवादीत अजित पवार यांची घुसमट होतेय हे सर्वांना माहिती आहे. उमदा नेते आमच्यासोबत आले आनंदच होईल. राजकारणात एकमेकांची मैत्री असते. एकमेकांप्रती आदर असतो. अजित दादा यांच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना आदर आहे. अजित दादा आपल्या सगळ्यांसोबत आले तर आनंदच होईल. राष्ट्रवादीत त्यांची जी घुसमट होतेय ती सगळ्यांनी बघितलीय. त्यामुळे त्यांच्यासारखा उमदा नेते आमच्यासोबत आले तर आनंदच आहे, अशी अशी भूमिका दीपक केसरकर यांनी मांडली. परंतु, केसरकर यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात गदारोळ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *