हिवरे तर्फे नारायणगाव येथे पंचशिल सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने महापरिनिर्वाण दिन साजरा
नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने हिवरे तर्फे नारायणगाव (ता. जुन्नर ) येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना रविवार दि. ६ डिसेंबर रोजी आदरांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी बुद्ध वंदना घेण्यात आली.त्यानंतर विविध मान्यवरांच्या वतीने भारतरत्न डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.


पंचशील सार्वजनिक वाचनालायच्या वतीने समाज मंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध मान्यवरांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जुन्नर तालुक्याचे उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे , जुन्नर पंचायत समितीचे सहायक गट विकास अधिकारी हेमंत गरीबे, नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दताञय गुंड, भाजपचे पुणे जिल्हा माजी उपाध्यक्ष नामदेव आण्णा खैरे , जुन्नर तालुकाचे राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे अध्यक्ष सुरज वाजगे , जुन्नर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश डोके , खादी ग्रामउद्योग मंडळाचे चेअरमन आत्माराम कसबे , प्राध्यापक किशोर चौरे , कैलास बोभाटे , दताञय जाधव, शब्बीर पठाण, हिवरे गावचे युवा सेना प्रमुख अभि खैरे , हिवरे गावचे युवा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख किरण भोर , दत्ता नाना भोर, हिरामण रणदिवे सुधिर शिदे , पोलिस पाटील विलास खोकराळे, तंटा मुक्तीचे अध्यक्ष सुनिल गायकवाड, पंचशील सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष आणि जेष्ठ पत्रकार खंडूराज गायकवाड, संदिप रणदिवे, रामदास रणदिवे, अविनाश रणदिवे, संजय रणदिवे, महेंद्र रोकडे, सुरेश रणदिवे, संतोष रणदिवे, तुषार रणदिवे, बळीराम रणदिवे, रोहन रणदिवे,विकास रणदिवे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य वर ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुञसंचालन शुभम जाधव यांनी केले.
