पंकजा मुंडे मोदींना आव्हान देऊ शकत नाही – एकनाथ खडसे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२८ सप्टेंबर २०२२


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातून वंशवाद संपवायचा आहे, पण मला कोणीही संपवू शकत नाहीत, असे वक्तव्य भाजपच्या राष्ट्री सचिव पंकजा मुंडे यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्याची भाषा केली असेल तर हे दुर्दैवी आहे. त्या मोदींना आव्हान देऊ शकत नाही. त्यांच्या विधानाचा अर्थही तसा घेऊ नये,असं एकनाथ खडसे म्हणाले आहे. पंकजा मुंडे पार्टीच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या आहेत. त्यांनी अनेकदा मोदींबाबत किंवा पक्षातील वरिष्ठ नेत्यांबाबत नाराजी व्यक्ती केली आहे. तरीही त्या केंद्रीय नेत्यांचं नेतृत्व मान्य करून आपल्या पक्षासाठी काम करत आहेत, असंही एकनाथ खडसे म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *