निमगाव सावा येथे बेकादेशीर जुगार खेळणाऱ्या ६ जणांवर पोलिसांची कारवाई

बेल्हे दि.०७ – (विभागीय संपादक रामदास सांगळे)

निमगाव सावा येथे बेकादेशीर जुगार खेळणाऱ्या ६ जणांवर नारायणगाव पोलिसांनी कारवाई करून २० हजार ५०० जप्त केले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक डि के गुंड यांनी दिली.

बबन अण्णा गायकवाड, मुनीर मोहम्मद पठाण, सचिन पांडुरंग जावळे, मारुती विलास गायकवाड. सर्व रा. निमगाव सावा ता.जुन्नर व सुनील सावळेराम गायकवाड रा.सोकोरी, ता. जुन्नर, दिनकर भाऊ जाधव रा.शिरोली, ता.जुन्नर यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

फिर्याद पोलीस शिपाई डि के साबळे यांनी दिली आहे. गुंड यांनी दिलेल्या माहितीनुसार काल दि ६ रात्री ७ वा सुमारास निमगाव सावा गावच्या हद्दीत खंडोबा मंदिराचे पायथ्याला उसाचे शेताच्या कडेला बाभळीच्या झाडाच्या आडोशाला काही इसम जुगार खेळत असल्याची माहिती गुंड यांना मिळाली असता पोलीस शिपाई दिनेश साबळे, सचिन कोंबल, प्रवीण लोहटे, संतोष दुपारगुडे, संतोष साळुंके यांनी छापा टाकून बबन गायकवाड यांच्यसह ६ जण तीन पत्ती नावाचा जुगार पैशावर खेळत असताना आढळून आले. यावेळी २० हजार ५०० जप्त करण्यात आले. यापुढील तपास महिला पोलीस नाईक रंजना मेचकर ह्या करीत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *