(बातमी – विभागीय संपादक रवींद्र खुडे शिरूर)
लहुजी उस्ताद साळवे हे एक मातंग समाजातील शूरवीर लढवैय्ये सैनिक म्हणून इतिहासात अजरामर झालेत. १७ फेब्रुवारी या दिवशी त्यांची प्राणज्योत मालावल्याने, संपूर्ण देशभर या दिवशी त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. शिरूरमधील अण्णाभाऊ साठे चौकात कार्यक्रम घेण्यात आला.
शिरूर शहर लहुजी शक्ती सेनेचे शहराध्यक्ष बंटी जोगदंड यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष व शिरूर न पा चे नगरसेवक विनोद भालेराव, जेष्ठ कार्यकर्ते तुकाराम खोले, म न से चे शहराध्यक्ष ऍड स्वप्नील माळवे, बहुजन मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष फिरोज सय्यद, दहिवडी सोसायटी चे माजी चेअरमन गणेश कोतवाल, सामाजीक कार्यकर्ते रामभाऊ नेटके, माजी सैनिक भरत घावटे, दीपक फलके, सचिन इंदोरकर, आकाश पवार, अविनाश साबळे, फैय्याज शेख, रोहन सोनवणे, प्रमोद जोगदंड, हिरामण वळू आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
दिवसभरात अनेक मान्यवरांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले, त्यात भा ज प झोपडपट्टी सुरक्षा समितीचे तालुकाध्यक्ष सतीश घोलप, राजू नवले इ नि लहुजींचे दर्शन घेतले.