विषय- पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत सुरु असलेली शाळा दत्तक घेणेबाबत…

पिंपरी चिंचवड या औद्योगिक नगरामध्ये एकूण लोकसंख्या सुमोर २५ लाख असून शहरामध्ये एकूण ७२ झोपडपटटया असल्याने सामान्य गोरगरीब मजूर लोकांची मुले महानगरपालिका शाळेत शिक्षण घेत असतात. तसेच गरीब गरजू विद्यार्थी यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणेसाठी मनपा व्यतिरिक्त इतर मदतीच्या हातांची आवश्यकता आहे. आपल्या पोलिस आयुक्तलयाचे कार्य शहरातील कायदा व सुव्यवस्था सांभाळणेकामी अतिशय चांगले व मोलाचे ठरत आहे. तसेच आपल्या कार्याचा शहरातील सर्वांनाच सार्थ अभिमान वाटतो.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपल्या माध्यमातून “पोलिसांची मुले उद्योजक बनली पाहिजे” असा अभिनव प्रकल्प आपण हाती घेतला असून त्याबददल आपले मनपूर्वक अभिनंदन. तसेच पिंपरी चिंचवड शहरातील मनपा अंतर्गत इयत्ता १ ते १० वी पर्यंत एक शाळा आपण दत्तक घेऊन शहरासाठी एक आदर्श निर्माण करावा जेणेकरुन शहरातील अनेक नामांकित संस्था, उद्योजक हे मदतीचा हात पुढे करुन या शहरातील शिक्षणाच्या दर्जाला एक वैभव प्राप्त करुन देतील व पिंपरी चिंचवड शहर देखील विद्येचे माहेर घर म्हणुन भविष्यामध्ये ओळखले जाईल. तसेच मा. पोलिस आयुक्त साहेबांशी चर्चा करताना केशव हनुमंत घोळवे, उपमहापौर यांना पोलिस आयुक्तलयांतर्गत एक शाळा ऐवजी दोन मनपा शाळा दत्तक घेणार असे आश्वासन मा. कृष्ण प्रकाशजी यांनी दिले. तसेच मा. पोलिस आयुक्त यांनी पोलिस वेलफेअर मार्फत वरिष्ठ पोलिस निरिक्षक यांची तातडीने टिम नियुक्ती करुन काही पोलिस अधिकारी निवडून वेलफेअरचे मुख्य अधिकारी म्हणून .डॉ. सागर कवडे साहेब, (सहाय्यक पोलिस आयुक्त) यांची निवड केली. तसेच अतिशय कमी वेळामध्ये एवढा मोठा निर्णय घेणारे शहरातील पहिले कार्यक्षम पोलिस आयुक्त म्हणून मा. कृष्ण प्रकाशजी यांनी आम्हांला उत्तम प्रकारे सहकार्य केलेले आहे.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकूण १२३ मनपा शाळा असून या सर्व शाळांची व विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी उपमहापौर या नात्याने शहरातील अनेक विविध नामांकित संस्था, उद्योजक यांना आवाहन करण्यात येते की, आपणही या शाळा दत्तक योजनेमध्ये समाविष्ट होऊन आपले पिंपरी चिंचवड शहर हे देशातील शिक्षण क्षेत्रात पहिल्या क्रमांकाचे विद्येचे माहेर घर म्हणून ओळख निर्माण करुन देण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे. तरी या वेळी मा. पोलिस आयुक्त, श्री. कृष्ण प्रकाशजी, मा. उपमहापौर, श्री. केशव हनुमंत घोळवे, व शिक्षण विभागाचे अधिकारी मा. शिंदे साहेब हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *