पोलिस बांधवांसोबत उत्साहात रक्षाबंधन साजरे, लायन्स क्लब चा उपक्रम

नारायणगाव – (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी यांच्या वतीने पोलिस स्टेशन,नारायणगाव येथे पोलिस बांधवांसोबत नुकतेच उत्साहात रक्षाबंधन साजरे करण्यात आले, या प्रसंगी लायन्स महिला भगिनींनी सर्व पोलिस अधिकारी व सर्व पोलिसांना राख्या बांधल्या.
याप्रसंगी बोलताना सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी सर्व लायन्स भगिनिंचे स्वागत केले. त्यांनी बोलताना सांगितले की आमच्या व्यस्त कामाच्या व्यापातून खूप वेळा आम्हाला सण उत्सवाला घरी जाता येते नाही. अनेक वेळा रक्षाबंधन आली की मनात शंका असते या वर्षी हाताला राखी बांधली जाईल की नाही पण आपल्या सारख्या भगिणी येऊन आम्हाला राखी बांधून ही कमी नेहमीच पूर्ण करत असतात.
या प्रसंगी सर्व महिलांना संपूर्ण पोलिस स्टेशनची माहिती देण्यात आली,कोणता विभाग काय काम करतो,गुन्हाची नोंद कुठे केले जाते,तसेच पोलिस बांधवांचे दैनंदिन जीवन कसे असते,सणाच्या दिवशी त्यांना घरी जाता येते का अशा अनेक गोष्टी वर चर्चा करून लायन्सच्या महिलांनी माहिती घेतली.

या प्रसंगी सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार, उपनिरीक्षक सनिल धनवे, जगदीश पाटील , पोलीस अंमलदार पोपट मोहरे, पोलीस अंमलदार दत्ता ढेंबरे, अदिनाथ लोखंडे, गंगाधर कोतकर, काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमाचे आयोजन अध्यक्ष ला.योगेश रायकर, सचिव ला.राजेंद्रकुमार देसाई,खजिनदार ला.संजय शिंदे, ला.सारिका रायकर,ला.नीता देसाई, ला.रोहिणी शिंदे,ला.शितल जठार,ला.भाग्यश्री गोसावी,ला.गौरी शेटे,ला.डॉ. पूर्वा गांधी,ला.डॉ.अनुष्का शिंदे तसेच ला.डॉ.प्रविण शिंदे,ला.महेश शेटे,ला.सुयोग गांधी,ला.नरेंद्र गोसावी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *