डेंग्यू बाबाबत प्रतिबंधात्मक उपाय योजना त्वरित राबण्यात याव्या – मंचर शहर भाजपा तर्फे मंचर ग्रामपंचायत ला निवेदन

मंचर मधील जागोजागी पडलेला कचरा त्वरित उचलावा तसेच डेंग्यू च्या प्रतिबंधात्मक योजना त्वरित राबवण्यासंदर्भात मंचर शहर भाजपा च्या वतीने मंचर ग्रामपंचायत ला निवेदन देण्यात आले
मंचर मध्ये गेल्या काही दिवसात डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याने कोरोनसोबतच डेंग्यू सारख्या साथ रोगांचाही सामना नागरिकांना करावा लागत आहे. याबाबत मंचर शहर भाजपा च्या वतीने मंचर ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन दिले आहे. कोरोना रुग्णांची संख्या मंचर मध्ये घटली असली तरी डेंग्यू हा साथ रोग शहरात डोके वर काढू पहात आहे नुकतेच डेंग्यू चे ६ रुग्ण गावात आढळून आले आहेत. मंचर गावठाणात बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागले आहेत तसेच नागरिक मोकळ्या व पडीक जागेत कचरा टाकत आहे यातच अधे-मधे होणाऱ्या पावसामुळे सदर कचऱ्याचे ढीग हे डासांचे उत्पत्तीस्थान ठरत आहे यामुळे मंचर च्या नागरिकांचे कोरोना सोबतच डेंग्यू, मलेरिया यासारख्या साथ रोगांमुळे आरोग्य धोक्यात आले आहे.

तरी मंचर ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ डेंग्यू चे प्रतिबंधात्मक उपाय करावे तसेच जागोजागी पडलेले कचऱ्याचे ढीग उचलून शहरामध्ये धूर फवारणी करावी तसेच सदर साथ रोगाबाबत तालुक्याच्या आरोग्य विभागाला कळवून योग्य त्या उपयोजना कराव्यात आणि जनतेत या साथ रोगाबाबत जनजागृती करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी भाजपाचे संघटन सरचिटणीस संदीप बाणखेले, मंचर शहराध्यक्ष नवनाथ थोरात, युवा उपाध्यक्ष सुशांत थोरात, सोमनाथ फल्ले, गणेश बाणखेले,रोहन खानदेशे, फैज जमादार, विकास बाणखेले उपस्थित होते.
