दोन पाटलांची प्रतिष्ठा पणाला… चंद्रकांत दादा पटलांवर जयंत पाटलांचा वरचष्मा.

कडेपुर मध्ये शांतता तर पलूस मध्ये जल्लोष

रोहित खर्गे, विभागीय संपादक

पुण्यातील पदवीधर मतदारसंघातील निवडणूक अतिशय चुरशीची होईल असे वाटत असताना महाविकास आघाडीचे अरुण लाड यांनी एकतर्फी 20 वर्ष सत्ता असलेल्या भाजपकडून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत हिरावून घेतला. पुणे पदवीधर मतदार संघाकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष्य लागले होते कारण येथे दिग्गज दोन पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. दोन्ही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व जयंत पाटील यांनी अपली सर्व प्रतिष्ठा पणाला लावली होती त्यात पलूस चे जयंत पाटील यांची सरशी झाली. महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड प्रचंड मताधिक्याने निवडून आले आणि पलूस च्या पाटलांनी चंद्रकांत पटलांवर 20 वर्ष अभेद्य असलेल्या पुणे पदवीधर मतदार संघावर महाविकास आघाडीचा झेंडा रोवला. विजयी झालेले अरुण लाड यांच्याशी बोलले असता ते म्हणाले चंद्रकांत पाटील यांच्यामुळेच माझा विजय झाला. कारण ते भाषणात नेहमी म्हणत असे की माझ्याकडून राहिलेल्या कामांसाठी देशमुख यांना निवडून द्या. म्हणजे जनतेला त्यांनीच सांगितले की मी काहीच कामे केली नाहीत व ते मतदारांनी ध्यानात घेतले व तोच रोष मतदानातून दाखवून दिला. व आमचा विजय चंद्रकांत पाटलांनी सुकर केला. माझ्या डोक्यावर पवार साहेबांचा आशीर्वाद व महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी कार्यकर्त्यानी एकजुटीने काम करून हा विजय खेचून आणला त्या सर्वांचा मी आभारी आहे असे अरुण लाड यांनी सांगितले.
दोन्ही उमेदवार सांगलीचे असल्याने अरुण लाड यांच्या विजयानंतर कडेवर मध्ये शांतता तर पलूस मध्ये जल्लोष पाहायला मिळाला.

पुणे पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या अरुण लाड यांनी पहिल्या फेरीत विजयासाठी आवश्यक असलेली मते मिळवली आहेत. मतमोजणी सुरुच राहणार असली तरी लाड यांचा विजय निश्चित आहे. दरम्यान, अधिकृत घोषणा दुपारी १ वाजेपर्यंत होईल, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे अरुण लाड यांना १ लाख २२ हजार १४५ मते मिळाली. भाजपच्या संग्राम देशमुख यांना ७३ हजार ३२१ मिळाली. त्यांनी १ लाख १४ हजार १३७ चा कोटा पूर्ण करून विजयी आघाडी घेतली आहे.

पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा अरुण लाड यांनी पूर्ण केल्याने दुसऱ्या पसंतीची मते मोजण्याची आवश्यकता नाही, असे सांगण्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या अरुण लाड यांच्या विरोधात भाजपच्या संग्राम देशमुख यांचे आव्हान होते. विशेष म्हणजे दोन्ही उमेदवार सांगलीचे आहेत. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पदवीधरसाठी चुरशीने मतदान झाले होते.
हा निकाल काही अनपेक्षित आहे असे नाही तिन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे आमचा पराभव झाला. मित्रपक्ष आमच्या बरोबर नव्हते ही बाब खरी आहे. या निवडणुकीत शिवसेनेला भोपळा मिळाला आहे.
तुम्ही मुख्यमंत्री अहात तुम्ही दोन जागा मागा पण तुम्ही शून्य झालात. शेवटी नुवडणुकामध्ये कोण्हीही वन टू वन निवडून येत नाही. तुम्ही एकटे लढून दाखवा असे चंद्रकांत दादा पाटील पराभवानंतर म्हणाले.
तुम्ही वेगळे वेगळे लढून दाखवा असा पुनरुच्चार पुन्हा केला.

महाविकास आघाडीचे पदवीधरचे अरुण लाड यांनी विजयानंतर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, माझा विजय हा महाविकास आघाडीचा आहे, सर्वांनी काम केलं. त्यामुळे माझा विजय झाला आहे. निवडणुकीची तयारी केली असून,गाव खेड्यात जाऊन मतदार नोंदणी करून घेतली, त्याचा परिणाम यातून दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *