पुणे जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडी- माजी खासदार आढळराव पाटील…कोल्हेंनी उंटाच्या पार्श्व भागाचा मुका घेण्याचे काम करू नये – आढळराव पाटील…

आपला आवाज न्यूज नेटवर्क
बातमी
दि.18/7/2021

पुणे जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडी- माजी खासदार आढळराव पाटील

मंचर: पुणे-नाशिक महामार्गावरील खेड व नारायणगाव बायपास च्या उदघाटनावरून पुणे जिल्ह्यात महाविकास आघाडीत राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्यांमुळेच बिघाडी सुरु झालीय.नारायणगाव व खेडच्या बाह्यवळणाच्या उद्घाटनप्रसंगी जाहिर वक्तव्यानंतर बिघाडीचं चित्र जाहिरपणे केलं गेलं.महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र असताना बाह्यवळणाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांना डाववले गेलेच पण मलाही साधा फोन केला नाही आणि ज्यांनी मोठं केलं त्यांनाचा लक्ष केलं कोल्हेनी जेवढं स्क्रिप्ट दिलं तेवढंच वाचावे अशा शब्दात माजी खासदार शिवाजी आढळराव यांनी कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर तोंडसुख घेतले.
माजी खासदार शिवाजी आढळराव यांनी आज लांडेवाडी इथे पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते.जाहिर कार्यक्रमात थेट मुख्यमंत्र्यांना खासदार कोल्हेंनी काल लक्ष केलं होत.कोल्हेंनी स्वताची लायकी आणि अवकात पाहून वक्तव्य करावं.हाच लबाड कोल्हा शिवसेनेतुनच मोठा झाला आणि आता त्याच शिवसेनेवरच बोलायचे हा या माणसातील गुणधर्म आहे का? आणि राजकारनात खालच्या पातळीवर जाऊन तरुण आणि म्हतारे असं समीकरण जोडुन लोकांची दिशाभुल केली जातेय. मी म्हातारा जरी असतो तरी माझ्याकडे बुद्धीमता, समज आहे यांच्यासारखा नटसम्राटासारखं नाही असं म्हणत अनेक मुद्द्यावरुन खासदार कोल्हेंना आढळरावांनी लक्ष केलय.
आढळराव पुढे म्हणाले की मी खासदार असताना लोकसभेत भांडून 2018 ला माझ्या पाठपुराव्यामूळेच या महामार्गाच्या कामाचा पाठपुरावा केला मार्च 2019 ला भूमिपूजन केलं.माझं श्रेय असताना मला डावललं जात आहे.आता मी खासदार नाही ठीक आहे.पण मला उदघाटनाला किमान फोन तरी करायला हवा होता मुख्यमंत्री यांचा फोटो तरी. जाहिरातीत वापरायला पाहिजे होता.पुणे जिल्ह्यात सगळ्यात जास्त बिघाडी इथले राष्ट्रवादीचे नेते,अमोल कोल्हे,दिलीप मोहिते करतात
काल कोल्हे यांनी अकलेचे तारे तोडले.कोल्ह्यानी उंटाच्या पार्शभागाचा मुका घ्यायचा प्रयत्न करू नये असा इशारा दिला.कोल्हेला अडीच लाख पगार आहे. शिवाय हा माणूस म्हणतोय शूटिंग केल्या शिवाय माझी चूल पेटत नाही तर मग सकाळी 7 ते संध्याकाळी 7 शूटिंग साठी निवडून दिलंय?.असा सवाल करत कालच्या वक्तव्याचा आढळराव यांनी जाहीर निषेध व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *