वैष्णवी मल्टिस्टेटच्या वसुली अधिकाऱ्यांने डल्ला मारलेले ११४ तोळे सोने पोलिसांनी केले परत

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
१६ जून २०२२

आळेफाटा


बेल्हे (ता.जुन्नर) येथील वैष्णवी मल्टीस्टेट मल्टिस्टेट मधून २९ मार्च २०२२ रोजी चोरीस गेलेले ११४ तोळे सोन्याचे दागिने आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिरसागर त्यांनी संस्थापक वसंत जगताप यांच्या स्वाधीन केले. वैष्णवी मल्टीस्टेट वसुली अधिकारी विकास खिलारी याने ग्राहकांनी ठेवलेल्या सोन्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून डल्ला मारला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शाखा व्यवस्थापक विनोद महाडिक यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या नंतर वसुली अधिकारी विकास खिलारी व त्याचा साथीदार सचिन सोनवणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर व त्यांच्या सहकाऱ्यांनी यांनी मोठ्या शिताफीने २४ तासातआरोपींना अटक केली.आरोपिकडून मुद्देमाल हस्तगत केला. कोर्टाच्या आदेशानुसार हस्तगत केलेला मुद्देमाल बुधवार (दि.१५) रोजी आळेफाटा पोलिसांनी वैष्णवी चे संस्थापक वसंत जगताप, शाखा व्यवस्थापक विनोद महाडिक,चेअरमन टी. एल गुंजाळ, संचालक राकेश डोळस, अब्बास बेपारी, लिपिक अक्षय जगताप, यांच्या स्वाधीन केला. मुद्देमाल मिळाल्याने संस्थेच्यावतीने संस्थापक वसंत जगताप यांनी पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर व टीमचे आभार मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *