बेशिस्त खेळाडूंमुळे पाकिस्तानचा न्यूझीलंड दौराच संकटात

बातमीदार- रोहित खर्गे, पुणे विभागीय संपादक

दि २ डिसेंम्बर २०२०, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात ३ ट्वेन्टी ट्वेन्टी आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका १८ डिसेंबर पासून सुरू होणार आहे तर चार दिवसीय सामना दहा आणि 17 डिसेंबरला खेळवण्यात येणार आहे.

पण पाकिस्तानचा न्यूझीलंड दौरा खेळाडूंच्या बेशिस्तपणामुळे क्वारंटाईन नियम मोडल्यामुळे पाकिस्तानी संघाला आधीच न्यूझीलंड सरकारकडून फायनल वॉर्निंग मिळाली आहे. त्यामुळे हा दौरा संकटात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेले पाकिस्तानचे आणखी 3 खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे ५३ सदस्यांपैकी १० खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह झालेले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह खेळाडूंची संख्या वाढल्याने आता त्यांच्या सारावावरही निर्बंध घातले गेले आहेत.

आणि या वाढत्या पॉझिटिव्ह संख्येमुळे हा दौराच संकटात येण्याची चिन्हे आहेत. अगोदर नियम मोडत असल्याचे व खेळाडूंना वारंवार वॉर्निंग देऊनही त्यांच्या वागण्यात फरक पडताना दिसत नाही त्यातच क्वारंनटाईन असलेले खेळाडू एकमेकांना भेटताना व जेवण वाटताना दिसले होते. त्यामुळे न्यूझीलंडचे आरोग्य अधिकारी डॉक्टर अश्ली ब्लूमफिल्ड यांनी अशा बेशिस्त खेळाडूंचे कान टोचले होते. आणि कोरोना सारख्या महामारीत अशा बेशिस्तपणामुळे पूर्ण दौराच संकटात आल्याने पूर्ण क्रिकेट विश्वात पाकिस्तान खेळाडूंच्या बेशिस्तपणामुळे चर्चेचा विषय बनले आहेत.