चेन्नई सुपर टीमच्या ऋतुराजच्या कुटुंबियांना महापौरांनी दिल्या शुभेच्छा प्रत्यक्ष भेट देऊन केले ऋतुराजच्या पालकांचे कौतुक

बातमीदार : रोहित खर्गे, विभागीय संपादक

पिंपरी : २ नोव्हेंबर, आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघाकडून यशस्वी खेळ करुन आपली वेगळी छाप पाडणारा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड पिंपरी चिंचवड शहरातील जुनी सांगवीचा  रहिवासी आहे. त्याने आयपीएलमध्ये तीन अर्धशतक झळकावत केलेल्या यशस्वी खेळाने क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधले आहे. ऋतुराज हा आपल्या  शहरातील रहिवासी असल्याने महापौर सौ. उषा उर्फ माई ढोरे यांनी ऋतुराजच्या पालकांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.

आयपीएल सामन्यामध्ये २३ वर्षीय ऋतुराज अगोदरच्या 3 खेळीत अपयशी ठरला असला तरी नंतर त्याला सूर गवसला व सलग तीन सामन्यांत अर्धशतक झळकावले. आपली वेगळी छाप त्याने आयपीएलमध्ये पाडली आहे. चांगली कामगिरी केल्याने सचिन तेंडुलकर, चेन्नई संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी यानेही त्याचे कौतुक केले.
 
जुनी सांगवीमध्ये गेली अनेक वर्षे राहत असल्याने महापौर माई ढोरे यांनी सातत्याने खेळाडू म्हणून ऋतुराजला प्रोत्साहन दिले असल्याचे पालकांनी सांगितले. आयपीएल मधील त्याचा खेळ पाहून महापौरांनी त्याच्या पालकांना शुभेच्छा भेट दिली.

यावेळी महापौर माई ढोरे यांनी वडील श्री. दशरथ गायकवाड आणि आई सौ. सविता गायकवाड यांना भेट देत ऋतुराजचे कौतुक केल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी महापौरांसोबत नगरसेविका सौ.शारदा सोनावणे, श्री.संतोष ढोरे, धनंजय ढोरे, हिरेण सोनवणे, भुषण शिंदे, जवाहर ढोरे, ओंकार स्वामी, यतीन शिंदे, अजय यादव आदी उपस्थित होते.

ऋतुराजचे आपल्या शहरात कुटुंब जुनी सांगवी येथे गेली  २० – २५  वर्षे  वास्तव्यास आहे. खेळाडू म्हणून त्याला घरच्यांनी चांगली साथ दिली आहे. तसेच खेळासाठी त्याने सातत्याने घेतलेले केलेले कष्ट आम्ही पाहिले आहेत. आयपीएल मध्ये उत्तम कामगिरी करत त्याने आपल्या शहराचे आणि आईवडिलांचे नाव उज्ज्वल केले आहे.