शिवजयंती निमित्त शिवकालीन मर्दानी खेळांच्या जिल्हास्तरीय स्पर्धा – २०२२
रोहित खर्गे
विभागीय संपादक
२४ फेब्रुवारी २०२२
आकुर्डी

शिवजयंती निमित्त एक नवीन संकल्पना म्हणून मर्दानी खेळ असोसिएशन पिंपरी चिंचवड यांच्या वतीने शिवकालीन मर्दानी खेळांच्या स्पर्धा केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल आकुर्डी येथे आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये देहुगावा, चिखली, चिंचवड, वडगाव, जाधववाडी, चर्होली, कान्हेगाव, मावळ येथील खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
मर्दानी खेळ असोसिएशन महाराष्ट्र राज्य आणि मर्दानी खेळ असोसिएशन पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने इतिहासात पहिल्यांदाच शिवजयंती निमित्त शिवकालीन मर्दानी खेळांच्या स्पर्धा महाराष्ट्रात आयोजित करण्यात आल्या.या स्पर्धेमध्ये वडगाव मावळ या संघाने प्रथम क्रमांक, अभंग स्पोर्ट्स अकॅडमी देहुगाव संघाने द्वितीय क्रमांक तसेच जाधववाडी आणि चर्होली संघ यांनी संयुक्त पणे त्रितीय क्रमांक पटकावला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक नानासाहेब काळभोर, राम रैना डायरेक्टर – केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल, समाजसेविका शितल वर्णेकर, अध्यक्ष प्रांत पोलिस राष्ट्रीय संघटना गोपाल बिरारी, राष्ट्रीय सैनिक संस्था अध्यक्ष प्रतापराव भोसले, श्रीया गोजमगुंडे, प्रांत पोलिस संघ महाराष्ट्र उपाध्यक्ष संदिप पोलकम, मर्दानी खेळ असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संजय बनसोडे, सचिव किरन अडागळे हे उपस्थित होते. पंच म्हणून स्मिता धिवार, अर्चना अडागळे , सुदर्शन सुर्यवंशी, रविराज चखाले, केतन नवले, अंजली बर्वे, गणेश चखाले, श्रेया दंडे, रुपाली चखाले यांनी उत्तम कामगिरी केली.