पिंपरी-चिंचवड शहरात ‘पे अँड पार्क’च्या नावाखाली सुरू असलेली वसुली बंद करा….मनसेचे आयुक्तांच्या दालनात आंदोलन..

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि १२ जुलै २०२१
पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात १ जुलैपासून ‘पे अँड पार्क’ योजना कार्यान्वित केली आहे. या पार्किंग धोरणाची अंमलबजावणी शहरात सुरु आहे. यात १३ मुख्य रस्ते व उड्डाणपुलाखालील काही जागांचा समावेश आहे. मुळात अशा जाचक योजनेसाठी नागरिकांच्या सुचना/हरकती यांचा विचार झालेला नाही. योजनेचा कोणताही आराखडा नागरिकांपुढे ठेवलेला नाही.

‘पे अँड पार्क’ मुळे रस्त्यावर लावलेल्या वाहनांकडून पावतीच्या माध्यमातून दंड आकारला जातोय. नागरिक संभ्रमात आहेत. आर्थिक भुर्दंडालाही सामोरं जावं लागतयं. वाहनं रस्त्यावर लावल्यामुळे पावती फाडणारं व्यवस्थापन व नागरिकांमध्ये बाचाबाची होतेय.

त्यामुळे शहर मनसेचा ‘पे अँड पार्क’ योजनेला विरोध आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेतदेखील आम्ही योजना गुंडाळण्याची मागणी केली होती. आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करून सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर शहरात ‘पे अँड पार्क’ योजनेची अंमलबजावणी सुरु केली. मुळात या योजनेत अनेक त्रुटी आहेत. मुख्य रस्त्याच्या कडेला असणाऱ्या बँका, खासगी व शासकीय कार्यालयं, वर्दळीची ठिकाणं अशा ठिकाणी केवळ पाच मिनिटांच्या कामासाठी नागरिकांना पाच ते वीस रुपयांच्या पावत्या फाडाव्या लागत आहेत. ही योजना मुळीच नागरिकांच्या हिताची नाही. आपण आयुक्त या नात्याने शहरातून ‘पे अँड पार्क’ योजना रद्द करा. अन्यथा आम्हाला खळळखट्याक आंदोलन करावे लागेल. असा इशारा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात मनसे चे गटनेते सचिन चिखले यांनी दिला.

आजचे आंदोलन आयुक्त दालना मध्ये करण्यात आले यावेळी रुपेश पटेकर , अश्विनी बांगर, अनिता पांचाळ ,हेमंत डांगे , सुशांत साळवी , सिमा बेलापुरकर , विशाल मानकरी, अनिकेत प्रभु, रोहिदास शिवणेकर , सुरेश सकट, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *