चाकण मधील विटेक्सो कंपनीमध्ये एकवीस हजार रुपयांचा वेतनवाढ करार संपन्न

बातमीदार : रोहित खर्गे, विभागीय संपादक

पिंपरी : दि. २ नोव्हेंबर २०२०, कोरोना महामारीचे सावट असल्यामुळे देशभर औद्योगिक व व्यापार विषयक मंदीचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर कामगारांची एकजूट व कंपनी व्यवस्थापनाने सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे चाकण येथील विटेक्सो टेक्नोलॉजीस कंपनीमध्ये 21,000 रुपयांच्या वेतन वाढीचा करार नुकताच संपन्न झाला. त्यामुळे चाकण औदयोगिक पट्यातील कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या करारात कंपनीच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक अनुराग गर्ग आणि हिंद कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी करारनाम्यावर स्वाक्षरी केली. यावेळी कंपनीचे शाखा प्रमुख रामचंद्रन रामनाथन, मनुष्यबळ विकास विभाग प्रमुख अर्चना श्रीवास्तव, मनुष्यबळ विकास अधिकारी सचिन महिंद्र, हिंद कामगार संघटनेचे सरचिटणीस यशवंत सुपेकर, खजिनदार सचिन कदम, युनिट प्रतिनिधी विजय राणे, सुरेश सांदुर, विकास धवन, नवनाथ जगताप आदी उपस्थित होते.

1 नोव्हेंबर 2019 ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीसाठी हा वेतनवाढीचा करार करण्यात आला. या वेतनवाढ करारानुसार कामगारांना प्रत्यक्ष मासिक 15,000 रुपये वेतनवाढ मिळणार आहे. तर अप्रत्यक्ष मासिक 6000 रुपये असे एकूण मासिक 21,000 रुपयांचा लाभ कामगारांना होणार आहे. तसेच एकूण वार्षिक पगाराच्या 17 टक्के बोनससह डी.ए., घरभाडे भत्ता, वाहतूक भत्ता, वाहन भत्ता, गणवेश भत्ता अधिक इतर भत्ते अशी अप्रत्यक्ष 6000 रुपये मासिक वेतन वाढ मिळणार आहे. वैद्यकीय विमा तीन लाख रुपये वार्षिक आणि वैदयकीय विमामध्ये आई, वडीलांचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच कामगारांसाठी वाहतूक व कॅन्टिन सुविधा देण्यात येणार आहे. तसेच कामगार किंवा त्यांचा कुटूंब सदस्य मयत झाल्यास 35,000 रुपये अत्यावश्यक मदत म्हणून देण्यात येणार आहेत.

या आस्थापनेत हिंद कामगार संघटना मान्यता प्राप्त संघटना असल्यामुळे कराराचा लाभ सर्व कायम कामगारांना होणार आहे. अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस यशवंत सुपेकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *