पालकमंत्री व शासनाच्या भोंगळ कारभारामुळे जम्बो रुग्णालयाचे निघाले वाभाडे

बातमीदार: रोहित खर्गे, विभागीय संपादक

महापौर उषा उर्फ माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके

पिंपरी चिंचवड दि. २१ ऑक्टोंबर : पुणे जिल्ह्यातुन कोरोना विषाणू हद्दपार करण्यासाठी व कोविड-१९ रुग्णांवर उपचार करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आण्णासाहेब मगर स्टेडीयम या ठिकाणी पालकमंत्र्याच्या पुढाकाराने राज्य शासन, पीएमआरडीए यांच्या माध्यमातुन जेम्बो रुग्णालयाची उभारणी करण्यात आली. या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील कोरोना रुग्णावर उपचार होत आहेत. सदर जम्बो रुग्णालयाचे मुख्यमंत्री मा. उध्दवजी ठाकरे व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. अजितदादा पवार यांनी उद्घाटन केले. सदर उद्घाटनप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी सुचविल्याप्रमाणे पिंपरी चिंचवड महापालिकेने या जम्बो रुग्णालयासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. तसेच ऑक्सीजन, आवश्यक औषधे, गोळ्या त्याचप्रमाणे सर्व भौतिक सुविधाही उपलब्ध करुन दिल्या. त्याचप्रमाणे या रुग्णालयावर नियंत्रणासाठी महापालिकेचे डॉक्टर व अधिकारीसुध्दा उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
इतक्या साऱ्या सुविधा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उपलब्ध करुन देवुन देखील शासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या जम्बो रुग्णालयाचा भोंगळ कारभार समोर आला असुन शासन व ठेकेदार यांचेतील समन्वयाच्या अभावामुळे कोविड काळात आपल्या जिवाची पर्वा न करता रुग्णसेवा करणाऱ्या या रुग्णालयातील नर्स व इतर स्टाफ यांना पगार देण्यास असमर्थ ठरल्याने त्यांना कोणतीही पुर्वसुचना न देता कामावरुन कमी केल्याने त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. कोट्यावधीचा खर्च करुन सुध्दा कर्मचाऱ्यांचा पगार देणे या शासनाला जमलेले नाही. या प्रकारास सर्वस्वी पालकमंत्री व शासन जबाबदार असुन शासन व ठेकेदार यांच्या भोंगळ कारभारामुळे जम्बो रुग्णालयाचे वाभाडे निघाले आहे. वास्तविक पाहता या रुग्णालयाच्या निविदेचे काम पीएमआरडीए कडुन करण्यात आले असुन ठेकेदाराला निविदा दिलेली आहे. त्यात शासन व पीएमआरडीए चे लक्ष नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना नेमक कोण उघड्यावर सोडत आहे याचे गुपित उघड झालेले नाही.


मुळात महापालिकेच्या क्षेत्रातील कोविड रुग्णांबरोबरच हद्दीबाहेरील व ग्रामीण भागातील ४०% रुग्णांवर मनपामार्फत उपचार केले आहेत. तसे पाहिले तर ही जबाबदारी राज्य शासनाची आहे. असे असतानासुध्दा मानवतेच्या दृष्टीकोनोतुन मनपा ग्रामीण भागातील नागरिकांना सेवा देत आहे. तसे पाहता जिल्ह्याची कोरोना रुग्णांची परिस्थिती लक्षात घेवुन महापालिकेने शासनाला वारंवार सहकार्य केले आहे. त्यामुळे शासनाने महापालिकेचा झालेला अधिकचा खर्च देवुन सहकार्य करणे अपेक्षित आहे. तथापि असा निधी देणे दुरच मात्र जम्बो रुग्णालयातील ठेकेदार व प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची नाहक बदनामी होत आहे. असा आरोप महापौर उषा उर्फ माई ढोरे व पक्षनेते नामदेव ढाके यांनी केला आहे.

या भोंगळ कारभाराबाबत तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या पगाराविषयी व सुविधांचा अभाव यासंदर्भात महापौर उषा उर्फ माई ढोरे, स्थायी समिती चेअरमन संतोष अण्णा लोंढे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी आज जम्बो रुग्णालयाची समक्ष पाहणी करुन माहीती घेतली. त्यावेळी कर्मचाऱ्यांना तातडीने पगार देणेबाबतच्या सुचना पदाधिकाऱ्यांनी जम्बो रुग्णालयाच्या व्यवस्थापनास केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *