पालिकेच्या विविध विकास कामांना ७१ कोटी ६५ लाख रु ची स्थायी ची मंजुरी…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी, दि. १६ जून २०२१ महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकास कामांच्या येणा-या आणि झालेल्या सुमारे ७१ कोटी ६५ लाख रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात कै मधुकरराव पवळे सभागृहात स्थायी समितीची ऑनलाईन पध्दतीने सभा पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते.

प्रभाग क्रमांक २१ जिजामाता हॉस्पीटलची सीमाभिंत बांधणे व उर्वरित स्थापत्य विषयक कामे करण्याकामी ६७ लाख ३७ हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.६ मधील धावडे वस्ती व परिसरात स्थापत्य विषयक सुधारणेची कामे करण्याकामी ५९ लाख ७२ हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्रमांक ४ दिघी बोपखेल मधील रामनगर येथे ठिकठिकाणी ट्रिमिक्स कॉक्रीट करण्याकामी ५६ लाख ५७ हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

Advertise

प्रभाग क्र.१७ परिसरामध्ये विविध कंपन्या आणि मनपा मार्फत खोदण्यात आलेले चर डांबरीकरणाने दुरुस्त करण्यासाठी ५३ लाख ६५ हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

ब प्रभागात ठिकठिकाणी आवश्यकतेनुसार डांबरीकरण करण्याकामी ५९ लाख ४५ हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.१८ चिंचवड येथे मोरया गोसावी मंदिर शेजारी दशक्रिया घाट परिसराची स्थापत्य विषयक कामे करण्याकामी ६१ लाख ५९ हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.३२ मध्ये विविध परिसरात सुशोभिकरण व इतर स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी २७ लाख १० हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.२ कुदळवाडी जाधववाडी मध्ये ठिकठिकाणी पेव्हींग ब्लॉक बसविण्याकामी

३५ लाख ६९ हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

पवना नदीतील टाटा ब्रीज ते बोपखेल या क्षेञात असलेली जलपर्णी काढण्याकामी २५ लाख २० हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

अण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जंबो कोविड रुग्णालय उभारणीसाठी पायाभूत सुविधा देण्यासाठी तीन महीने कालावधीसाठी ५ कोटी ६६ लाख ४० हजार एवढा खर्च येणार आहे. त्यातील ३ कोटी ७७ लाख ६० हजार इतक्या खर्चास स्थायी समिती सभा ठराव क्र.९१४० दि.३१.०३.२०२१ अन्वये मान्यता दिलेली होती. उर्वरीत १ कोटी ८८ लाख ८० हजार च्या खर्चास मान्यता देण्यात आली.

Advertise

भक्ती शक्ती चौक ते मुकाई चौक किवळे बीआरटीएस कॉरिडॉरवरील शिंदे वस्ती येथे उड्डाणपुल बांधणेचे कामात अडथळा ठरणारा EHV,220 KV पयलोन शिफ्ट करणे या कामाचे सुपरविजन चार्जेस १ कोटी २१ लाख ८७ हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

सोनवणे वस्ती रामदासनगर परिसरातील जलनिःसारण व्य