बेल्ह्याच्या वैष्णवी मल्टीस्टेट सोसायटीच्या लॉकरमधून १०४ तोळे सोने गायब

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
०२ एप्रिल २०२२

बेल्हे


बेल्हे (ता. जुन्नर) येथील वैष्णवी मल्टीस्टेट अर्बन को.ऑ.सोसायटीच्या लॉकरमधून १०४ तोळे सोने गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून संशयित संस्थेच्या वसुली अधिकाऱ्यावर आळेफाटा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसुली अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल : पोलिसांनी घेतले ताब्यात

आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार २९ मार्च दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान बेल्हे (ता. जुन्नर) येथील वैष्णवी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या सीसीटीव्ही फुटेज नुसार सोसायटीचे वसुली अधिकारी व क्लर्कचे काम करणारे कर्मचारी विकास शांताराम खिलारी (वय ४१) (राहणार:- बेल्हे , तालुका जुन्नर,जिल्हा.पुणे) यांनी बंद करून सोसायटीच्या लॉकरमधून तब्बल ५१ लाख २१ हजार ३८२ रुपये किमतीचे १०४ तोळे ५१८ मिलीग्राम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची तक्रार विनोद दत्तात्रय महाडिक (वय ४३) राहणार बेल्हे, तालुका -जुन्नर जिल्हा .पुणे) यांनी आळेफाटा पोलिसात दिली आहे. यासंदर्भात कर्मचारी विकास शांताराम खिलारी यांना आळेफाटा पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *