शिंदेवाडी ग्रामस्थांकडून पूरग्रस्तांना एक हात मदतीचा :जीवनावश्यक वस्तू व किराणा साहित्याची केली मदत
आपला आवाज न्यूज नेटवर्क
बातमी:-
दि.31/7/2021
शिंदेवाडी ग्रामस्थांकडून पूरग्रस्तांना एक हात मदतीचा :जीवनावश्यक वस्तू व किराणा साहित्याची केली मदत
बातमी:- विभागीय संपादक रामदास सांगळे,जुन्नर
शिंदेवाडी:- अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आल्याने नागरीवस्तीत व नगरांमध्ये पुराचे पाणी शिरुन जनजिवन पुर्णत:विस्कळीत झालेल्या गावांना मदत म्हणून जुन्नर तालुक्यातील शिंदेवाडी गावातील ग्रामस्थांनी मदतीचा एक हात देत गृहपोयोगी साहित्य,किराणा व खाद्य पदार्थ दिले आहेत.
किराणा साहित्याचे किट बनवून तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्याकडे सुपूर्द केली आहे. गावातील नागरिकांनी ज्याला जसं शक्य होईल त्याप्रमाणे पैसे एकत्र करून साहित्य खरेदी केले.
या किराणा किट मध्ये साखर, रवा, बेसनपीठ, गहुआटा, तेल, डाळी, पोहे, तांदूळ, मीठ, मिरची, हळद, धनापावडर, साबण, कोलगेट, ब्रश, बिस्कीट अशा जीवनावश्यक वस्तू समाविष्ठ आहेत.गावचे सरपंच एम.डी.शिंदे यांच्या यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी सढळ हाताने मदत केली.