जनता दल (सेक्युलर) च्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी नाथाभाऊ शेवाळे यांची निवड…

बातमी : विभागीय संपादक रविंद्र खुडे
कारेगाव : दि. ३१/०७/२०२१.

शिरुर तालुक्याचे सुपुत्र व जनता दल सेक्युलरचे युवा प्रदेशाध्यक्ष, नाथाभाऊ शेवाळे यांच्या कार्याची दखल घेत, माजी पंतप्रधान तसेच जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी. देवेगौडा, यांनी नाथाभाऊ शेवाळे यांची जनता दल सेक्युलरच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड करत, तसे निवडीबाबतचे पत्र दिले आहे.

मौजे कारेगाव, ता. शिरूर, जी. पुणे येथील शेतकरी कुटुंबातील असलेले नाथाभाऊ शेवाळे, यांची जनता दलाचे एकनिष्ठ व निष्ठावंत असलेले कार्यकर्ते म्हणून, गेली अनेक वर्ष अवघ्या महाराष्ट्राला ओळख आहे. जनता दलाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रभर युवकांच्या अनेक प्रश्नांबाबत आवाज उठविला असून, शेतकऱ्यांच्या पेन्शन संबंधी यात्रा काढलेली आहे.
तसेच शेतकरी, शेतमजूर, अल्पसंख्यांक, आदिवासी, प्रकल्पग्रस्त आदी घटकांसाठी अनेक लढे उभारले आहेत. त्यांचा हसमुख स्वभाव, एखाद्या विषयावरील सखोल अभ्यास व आपल्याकडे आलेल्या कोणत्याही व्यक्तीचे प्रामाणिकपणे काम करून देण्याची सवय, तसेच सर्वसामान्य लोकांमध्ये भाऊ या नावाने प्रचलित असलेले व प्रत्येकाच्या मदतीला धावून जात असल्याने, ते लोकांमध्ये कामाचा माणूस म्हणून प्रचलित आहेत.

नाथाभाऊ शेवाळे यांची जनता दल (सेक्युलर) च्या प्रदेश कार्याध्यक्षपदी नुकतीच निवड झाल्याने, शिरूरकरांना सार्थ अभिमान असल्याचे मत अनेक लोकांनी आपला आवाज न्यूज नेटवर्कशी बोलून दाखविले. त्यांच्या या निवडीचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील, प्रधान सचिव प्रताप होगाडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्रीपतराव शिंदे, सचिव पी. डी. जोशी, अजमल खान, रेवण भोसले, मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर, संजीवकुमार सदानंद, किरण छिद्रवाल, सुहास बने, किरण सेठ, ज्योती बडेकर, भगवान साळवी आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांनी नाथाभाऊ शेवाळे यांचे प्रत्यक्ष भेटून तर काहींनी सोशल मीडिया द्वारे अभिनंदन केले आहे.

तर सर्वसामान्य लोकही प्रत्यक्ष भरतून, फोन करून व सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदन करत असल्याचे, नाथाभाऊ शेवाळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *