प्रभाग क्र २८ रहाटणी पिंपळे सौदागर मधील विविध सोसायटी मध्ये खासगी सफाई कामगार, घर कामगार, सुरक्षा रक्षक, व बांधकाम कामगार यांचासाठी दोन दिवसीय लसीकरण मोहीम आयोजित करा- माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे
रोहित खर्गे
विभागीय संपादक
पिंपरी – दि २६ जुलै २०२१
आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे महाराष्ट्र शासन निर्देशानुसार लस उपलब्धेनुसार वय वर्षे १८ पुढील सर्व नागरिकांचे शहरात लसीकरण करण्यात येत आहे. तसेच शहरातील खासगी रुग्णालयामध्ये देखील शासन निर्देशानुसार लसीकरण करण्यात येत आहे. प्रभाग क्र. २८ रहाटणी पिंपळे सौदागर येथे रहिवासी सोसायटी संख्या जास्त आहे येथे घर काम करणारे घर कामगार, खासगी सफाई कामगार, सुरक्षारक्षक यांची संख्या देखील जास्त आहे तसेच येथे नव्याने रहिवासी बांधकामे मोठ्या प्रमाणावर चालू आहेत अश्या बांधकाम साईट वर काम करणारे देखील अनेक कामगार आहेत, यातील बहुतेक नागरिकांकडे स्मार्ट फोन नाही, कोणतेही ओळखपत्र नाही व अनेकजण अशिक्षित असल्याने त्यांना ऑनलाइन नोंदणी करता येत नाही व हातावर पोट असल्याने त्यांना खासगी लसीकरण केंद्रावर जावून लस घेणे शक्य नसल्याने त्यामुळे अश्या नागरिकांचे लसीकरण राहिले आहे. या कामगारांचा कामाच्या ठिकाणी एक ना अनेक लोकांशी वारंवार संपर्क येत त्यामुळे त्यांचे लसीकरण करणे महत्वाचे आहे.
तरी माननीय आयुक्त महोदय शहरातील करोना प्रसार रोखण्यासाठी करोना प्रतिबंधित लस घेणे हे प्रभावी अस्त्र असल्याने वर नमूद केलेल्या नागरिकांसाठी रहाटणी पिंपळे सौदागर या प्रभागात दोन दिवसीय लसीकरण कॅम्प आयोजित करून संबधित नागरिकांचे लसीकरण करून देण्यात यावे असे आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.