पिंपरी चे आमदार अण्णा बनसोडे यांचे चिरंजीव सिद्धार्थ अण्णा बनसोडे यांच्यासह चौघांना अटक…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिपरी दि २७ मे २०२१
पिंपरीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडेंच्या पुत्रासह चौघांना अटक करण्यात यश आलेलं आहे. सिद्धार्थ बनसोडे असं पुत्राचे नाव आहे. कथित गोळीबाराची घटना 12 मे ला घडली होती. कंत्राटदार ऍंथोनीचा मॅनेजर तानाजी पवार ने हा गोळीबार केला होता. आमदारांनी त्यांच्या दिशेने हा गोळीबार झाल्याचा दावा केला होता. तर आमदार पुत्रासह कार्यकर्ते जीवे मारत असल्याने बचावासाठी हवेत गोळीबार केल्याचा प्रतिदावा तानाजीने केला होता. याप्रकरणी आमदार पुत्रासह कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल होता. तसेच या घटनेच्या एक दिवस आधी ऍंथोनीच्या कार्यलयात घुसून दोन कर्मचाऱ्यांवर ही जीवघेणा हल्ला झाला होता. त्यात ही आमदार पुत्र आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल आहेत. आत्तापर्यंत आमदार पुत्रासह नऊ समर्थकांना अटक करण्यात आलेली आहे. याशिवाय तानाजी पवारला पहिल्याच दिवशी बेड्या ठोकण्यात आलेल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *