खेड, दि. 7/6/2021
बातमी – प्रतिनिधी, अक्षता कान्हूरकर
दावडी हे पूर्व भागातील मोठं गाव आहे,दावडी गावातील लोकसंख्या जवळ पास दहा हजार आहे.दावडी गावातील विजेमूळ होणारी मनुष्य व वित्तहाणी टाळण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्यने महाराष्ट्र शासनाला ग्रामपंचायतीच्या मागणी नुसार खेड तालुक्यातील पाहिले वीज अटकाव केंद्र उभारण्यात येत आहे.
या उभारणी चे भूमीपूजन दावडी गावचे सरपंच संभाजी घारे, पोलीस पाटील आत्माराम डुंबरे पाटील, उपसरपंच राहुल कदम,उद्योजक सचिन नवले,यांच्या हस्ते झाले,यावेळी उपस्थित मा उपसरपंच हिरामण खेसे,ग्रामपंचायत सदस्य संतोष सातपुते,अनिल नेटके,पुष्पा होरे,संगीत मैंद,मेघना ववले,मारुती बोत्रे, तलाठी सतीश शेळके,उपस्थित होते.