आंबेगाव तालुक्यात दोन हत्या…एका घटनेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा तर दुसऱ्या घटनेत महिलेचा मृत्यू…

आंबेगांव
सदानंद शेवाळे
दि.27/05/2021

    पुणे जिल्ह्यातील आंबेगाव  तालुक्यात दोन हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आणि एका महिलेचा समावेश आहे. या दोन्ही स्वतंत्र घटना आहेत…

  पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात  दोन हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता याची आर्थिक वादातून  तर  एका महिलेचा भाजी आणायला जाते असे घरातून सांगून गेल्याने हत्या झाली असा समावेश आहे. या दोन्ही स्वतंत्र घटना आहेत…

    पहिली घटना रात्री आठच्या सुमारास घडली. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते सचिन जाधवांची हत्या झाली. पैश्यांच्या देवाण-घेवाणीतून ही हत्या झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर साखर कारखान्यापासून जवळ असलेल्या पोंदेवाडी फाट्यावर या घटनेची सुरुवात झाली. काल रात्री इथं सचिन जाधव यांचे बाळशीराम थिटे आणि विजय सूर्यवंशी यांच्याशी भांडण झालं. जाधव यांनी दिलेले पैसे ते परत करत नव्हते यावरून गेल्या काही दिवसांपासून वाद शिगेला पोहोचला होता. यातूनच हत्या झाल्याची माहीती पोलिसांनी दिली…
   तपास पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या मीहीती नुसार
जाधव यांच्याच गाडीत आरोपीने जाधव यांचा मृतदेह टाकला आणि गाडी अहमदनगर जिल्ह्याच्या दिशेने नेहली. पुणे जिल्हा संपताच नगर जिल्ह्यातील कोरथन घाट सुरू झाला. तिथं दरीत हा मृतदेह पेटवून दिला आणि गाडी तिथंच जवळपास सोडून दिली व पुरावे नष्ट करण्याचा त्यांचा इरादा होता…
      जाधव घरी परतले नाहीत म्हणून कुटुंबीयांनी मिसिंगची तक्रार दाखल केली होती. त्याअनुषंगाने तपास सुरू झाला आणि जळालेल्या अवस्थेत जाधव यांचा मृतदेह आढळला. तपासाची चक्र फिरताच थिटे आणि सूर्यवंशी यांना  पोलिसांनी अटक केली…

दुसरी घटना थोरांदळे येथे घडली. इथं द्रौपदाबाई गिरे यांचा मृतदेह डोक्यावर इजा झालेल्या अवस्थेत आढळला. आदिवासी समाजाच्या द्रौपदाबाई मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. पण आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावात त्या सध्या वास्तव्यास होत्या. इथंच शेतात राबून उदरनिर्वाह करायच्या. काल रात्री त्यांना एक फोन आला आणि त्या पाहुणे आले आहेत त्यांनी भाजीपाला आणला आहे तो जाऊन त्यांच्याकडून येते असे सांगून घराबाहेर पडल्या. बराचवेळ त्या घरी परतल्या नाहीत म्हणून शोध घेतला असता, जवळच रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह आढळला. या हत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. शेवटचा फोन कोणी केला त्याचा शोध पोलीस घेत आहेत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *