शहरातील खाजगी हॉस्पिटलना करोना प्रतिबंधक लसीकरणासाठी दर निश्चित करून मान्यता द्यावी-माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि २७ मे २०२१
शहरातील काही खासगी रुग्णालयांमार्फत करोना प्रतिबंधक लसीकरण मिळविण्यासाठी पालिकेकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र, पुणे शहरात या खासगी रुग्णालयांकडून वेगवेगळे दर आकारले जात आहेत. यात ६०० ते १२०० पर्यंत मनमानी दर आकारले जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे खासगी रुग्णालयांकडून होणाऱ्या लसीकरणासाठी आपल्या अधिकारात समान दर निश्चित करून दिले जावेत, अशी मागणी आहे.
शहरातील करोना संसर्गाची साथ आटोक्यात आणण्यासाठी पालिका प्रशासनाकडून योग्य नियोजन होत आहे. याच बरोबर करोना प्रतिबंधक लसीकरण वाढविण्यासाठी अनेक ठिकाणी लसीकरण सुरु असते. मात्र १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण अल्प प्रमाणात झाले आहे. सध्या ४५ ते ६० वयोगटातील पहिली आणि दुसरी लसीकरण मोहीम सुरु आहे. शहरात महापालिकेच्या वतीने ४,०९,७४२ तर खाजगी केंद्राकडून ७४,६९० असे एकूण ४,८४,४३२ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. शहरात दैनंदिन ४ ते ५ हजार नागरिकांचे लसीकरण होता आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अधिकाधिक लसीकरण होणे गरजेचे आहे.या महिन्यात शहराला पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होऊ न शकल्याने अनेक वेळा लसीकरण बंद ठेवावे लागले आणि नागरिकांच्या रोषाला महापालिका प्रशासन आणि नगरसेवकांना सामोरे जावे लागले. त्यामुळे खासगी रुग्णालयात लसीकरण मोहीम राबविण्यास तात्काळ परवानगी देण्यात यावी. त्याचबरोबर खासगी रुग्णालयांच्या लसीकरणासाठी एकसमान दर निश्चित करून द्यावेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक अधिकाधिक लास घेतली. तसेच खासगी रुग्णालयांकडून होणारे लसीकरण महापालिकेच्या यंत्रणेला मदत करणारे आहे. खासगी रुग्णालयांनाही व्यवस्थापन आणि वैद्यकीय खर्च करावा लागत आहे. ही वस्तुस्थिती समजून घेत रुग्णालयांचे नुकसान होणार नाही, अशी भूमिका घेत दर निश्चिती करावी, असे वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *