कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीचा अपहार करणाऱ्या कंपनी मालकांवर गुन्हा दाखल
दि. ३१/१२/२०२२
पिंपरी
पिंपरी : आपल्या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांच्या पगारातून भविष्य निर्वाह निधीची रक्कम कापून घेऊन ती भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा न तिचा अपहार करणाऱ्या कंपनी मालकांवर भोसरी पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी याप्रकरणी सुजन रविचंद्रन मुदलीयार (वय 53, रा. कोंढवा, पुणे) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरुन नितीन शंकर जितुरी (रा. पर्वती, पुणे) आणि मकरंद राजगुरू (वय 50, रा. कोथरूड, पुणे) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फोकस रोबोटोमेशन या कंपनीचे मालक असलेल्या आरोपींनी त्यांच्या कंपनीत काम करणारे कामगार योगेश खैरे यांचे जानेवारी ते मार्च 2019 या कालावधीतील चार हजार 800 रुपये आणि प्रसाद कामनदार यांचे ऑगस्ट 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीतील 10 हजार 800 रुपये भविष्य निर्वाह निधीत जमा करण्यासाठी पगारातून कापून घेतले. ते कायद्याप्रमाणे भविष्य निर्वाह निधीत जमा करणे बंधनकारक असताना जमा केले नाहीत. या रकमेचा अपहार केला. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.