पिंपरीपेंढार येथे विहिरीत पडून बिबट्याच्या मादीचा मृत्यू : बछडा व मादी एकाचवेळी विहिरीत पडले असल्याचा वनखात्याचा अंदाज

कैलास बोडके प्रतिनिधी
पिंपरीपेंढार(ता. जुन्नर) येथील नवलेवाडी परीसरातील एका शेतकऱ्याच्या विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला बाहेेर काढल्यानंतर बुधवारी ( दि १४ एप्रिल ) रोजी पुन्हा त्याच विहिरीत बिबट्याच्या मादीचा मृतदेह आढळून आला आहे त्यामुळे ही मादी आणि बिबट्या एकाचवेळी विहिरीत पडले असण्याची शक्यता वनखात्याने वर्तविली आहे
पिंपरीपेंढार येथील नवलेवाडी शिवारातील शेतकरी रभाजी पवार हे मंगळवारी ( दि १३)  सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास विहिरीजवळ गेले असता त्यांना विहिरीत बिबट्याचा बछडा पडला असल्याचे दिसून आले याबाबतची माहिती  त्यांनी तात्काळ वनविभागाला दिली या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनखात्याचे अधिकारी कर्मचारी व रेस्क्यू टिमचे सदस्य यांनी या बिबट्याच्या बछड्यास विहिरीमधुन सुखरुप बाहेर काढले ही घटना ताजी असतानाच बुधवारी ( दि १४)  पुन्हा याच विहिरीत बिबट्याच्या मादीचा मृतदेह पाण्यावर तरंगत असताना आढळून आला याबाबत वनखात्याला माहिती मिळाल्यानंतर वनपरॊक्षेत्र अधिकारी योगेश घोडके वनपाल एस के साळूंके वनरक्षक व्ही टी विभुते वनसेवक बी के खर्गे वनखात्याचे कर्मचारी तसेच रेस्क्यू टिमचे बाबाजी  खर्गे दीपक माळी आकाश माळी वसंत जाधव यांनी  या बिबट्याच्या मादीचा  मृतदेह बाहेर काढला या बिबट्याच्या मादीचे शवविच्छेदन केल्यानंतर या बिबट्याबर अंत्यसंस्कार करण्यात आले
बिबट्याची मादी आणि तिचा बछडा  भक्षाच्या शोधात असताना ही मादी व तिचा बछडा दोन्हीही एकाचवेळी विहिरीत पडले असण्याची शक्यता वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *