नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक

१६ डिसेंबर २०२२


छत्तीसगडमध्ये नुकत्याच सुरू झालेल्या नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या खिडकीवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्याची घटना समाेर आली आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) च्या रायपूर विभागांतर्गत दुर्ग आणि भिलाई नगर रेल्वे स्थानकांदरम्यान ही सेमी हाय स्पीड ट्रेन राज्यातील बिलासपूरला जात असताना बुधवारी संध्याकाळी ही घटना घडल्याचे रेल्वे अधीकऱ्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला हाेता. महाराष्ट्रातील नागपूर आणि छत्तीसगडमधील बिलासपूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, देशातील सहावी सेवा आहे.

अज्ञात ईसमाने ट्रेनवर दगडफेक केली, ज्यामुळे काल संध्याकाळी E1 कोचच्या खिडकीचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही, असे अधिकारी म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *