बांधकाम व्यावसायिकाच्या मनमानीला आमदार महेश लांडगे यांचा चाप!

  • प्रिस्टीन ग्रीन सोसायटीतील पार्किंग समस्येवार तोडगा
  • सदनिकाधारक, फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी मानले आभार

पिंपरी । प्रतिनिधी, दि.04/11/2020

चिखली-मोशी-चऱ्होली हाऊसिंग सोसायटीच्या फेडरेशनच्या माध्यमातून मोशी येथील प्रिस्टीन ग्रीन या 845 सदनिका असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थेमधील कार पार्किंगबाबतचा विषय भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी मार्गी लावला.

आमदार लांडगे यांनी प्रिस्टिंग ग्रीन सोसायटीचे बांधकाम व्यावसायिक श्री.गोयल यांना फोन करून हा विषय सोडवण्याची सूचना दिली. तसेच, महापालिका बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. मोहिते व श्री. गुंडाळ यांना प्रिस्टीन ग्रीन सोसायटीमधील पार्किंग चेक करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत…

यावेळी कार्यवाही वेळी फेडरेशनचे सचिव संजीवन सांगळे , प्रिस्टिंग ग्रीन सोसायटीचे सभासद , पिंपरी चिंचवड मनपाचे बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. मोहिते, श्री. गुंडाळ आदी उपस्थित होते….

दरम्यान, पिंपरी चिंचवड मनपाच्या बांधकाम विभागाचे अधिकारी प्रिस्टीन ग्रीन सोसायटीमध्ये गेले व सर्वेक्षण करून साईड मार्जिन न सोडता सोसायटीच्या खुल्या जागेत ज्या ओपन पार्किंग बिल्डरने दिल्या होत्या त्या लगेच रद्द करून, पार्किंगच्या लावलेल्या पाट्या काडून टाकल्या आहेत. फेडरेशन व सोसायटी धारकांच्यावर बिल्डरकडून नियमबाह्य पद्धतीने सोसायटीच्या खुल्या जागेत पार्किंग देऊन होणारा अन्याय दूर करून, नियमबाह्य काम करणाऱ्या बिल्डरला आमदार लांडगे यांनी दणका दिला आहे.

बिल्डरला नियमबाह्य काम करण्यापासून रोखणाऱ्या आमदार महेश लांडगे यांचे फेडरेशन व प्रिस्टीन ग्रीन सोसायटी धारकांनी आभार मानले आहेत.

रहिवाशांनी दिला होता उपोषणाचा इशारा…
प्रिस्टीन ग्रीन्स येथील रहिवाशांनी बांधकाम व्यावसायिकाची मनमानीविरोधात महापालिका प्रशासनाला उपोषणाचा इशारा दिला होता. संबंधित बांधकाम व्यावसायिकाने मंजूर आराखडा मनमानीपणे बदलून सोसायटीधारकांची गैरसोय केली आहे. डी.सी. नियामंप्रमाणे पार्किंगचे मार्किंग करण्यात आलेली नाही.

पार्किंगचा एरिया आणि ऑनसाईट एरियामध्ये तफावत आहे. सायकल व स्कूटरचे पार्किंग नियमाप्रमाणे नाही. हायटेंशन टॉवरखाली काहीही सुरक्षाव्यवस्था न करता पार्किंग दिली आहे. कॉमनस्पेसमध्ये सदनिकाधारकांना वि