निगडी परिसरात भटक्या कुत्र्यांचा त्रास

१६ डिसेंबर २०२२

निगडी


पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना कित्येक दिवसांपासून भटक्या, मोकाट कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या निगडीतील साईनाथनगर,यमुनानगर, रुपीनगर आदी परिसरांतील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. येथे दररोज कोणाला तरी कुत्रा चावा घेत आहेत तसेच पाठलाग केल्याने अनेक दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत . उपद्व्याप चालू असून, त्यांची दिवसेंदिवस संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे , त्यामुळे निगडी विभागातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

निगडी परिसरातील कुत्र्यांची दिवसेंदिवस संख्या वाढत असून , भटक्या कुत्र्यांनी नागरिकांना चावा शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न एकीकडे गंभीर होत असताना , हा प्रश्न सोडविण्यासाठी मनपाकडून उपाययोजना राबवल्या जात नाहीत. दररोज कुठल्या ना कुठल्या भागात कुन्यांनी घेतल्याचे रुग्णालयातील नोंदीवरून दिसते . यामध्ये लहान मुलांचे लचके कुत्र्यांनी तोडल्याच्या घटना जास्त आहेत . त्यामुळे लहान मुलांना कायमचे अपंगत्व आल्याच्याही घटना आहेत . काही मुलांचा मृत्यूही झाला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *