देवेंद्र फडणवीस यांचा अमित शाह यांना फोन, सीमावादावर चर्चा
०७ डिसेंबर २०२२
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दूरध्वनी करून सीमा प्रश्नावर तसेच गेल्या आठवड्यातील घडामोडींची संपूर्ण माहिती दिली. काल कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी झालेल्या दूरध्वनी संवादाचा दाखला सुद्धा त्यांनी यावेळी दिला. महाराष्ट्राचा विषय अमित शाह यांनी अतिशय गांभीर्यपूर्वक ऐकून घेतला. कालच माध्यमांशी बोलताना हा विषय आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मांडू, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.
महाराष्ट्रातील वाहनांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांना माहिती दिली. त्यानंतर शहा यांनी आपण या प्रश्नात गांभीर्याने लक्ष घालणार असल्याचं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे.