दिवाळीत किराणावरील खर्चावर जवळपास २० ते २५ टक्क्यांनी वाढ
पिंपरी प्रतिनिधी
१४ ऑक्टोबर २०२२
गेल्या वर्षीच्या दिवाळीपेक्षा यंदाच्या दिवाळीत महागाईच्या झळा सामान्य नागरिकांना बसू लागल्या आहेत यामुळे किराणा खर्चात जवळपास २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे . ऐन दिवाळीच्या तोंडावर वाढत्या महागाईचा फटका सहन करावा लागत आहे . यंदाच्या दिवाळी खरेदीत काहींना हात आखडता घ्यावा लागणार आहे . त्यामुळे यंदा महागाईची दिवाळीच सर्वांना साजरी करावी लागेल , असे सध्या तरी चित्र पाहावयास मिळत आहे . अवघ्या १५ दिवसांवर दिवाळी आली असताना सर्वच वस्तूंची महागाई वाढली आहे . त्यामुळे खर्च मात्र हजाराच्या पटीत वाढणार आहे.
तेलाचे भाव वाढलेलेच मध्यंतरी खाद्यतेलाचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात होते . मात्र , ऐन सणासुदीच्या काळात हेच तेलाचे भाव वाढले आहेत . दिवाळीत सर्व पदार्थ तयार करण्यासाठी खाद्यतेल अत्यावश्यक असते काही काळ खाद्यतेलाचे भाव स्थिर होते ; परंतु , आता ते वाढल्याने दिवाळी कशी करावी , असा प्रश्न पडला आहे .