शहरात गुरुवारी पावसाची जोरदार हजेरी

पिंपरी प्रतिनिधी
१४ ऑक्टोबर २०२२


शहरात गुरुवारी पावसाने जोरदार हजेरी लावली . दुपारी अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे कामानिमित्त बाहेर पडलेल्यांची त्रेधातिरपीट उडाली . शहरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते . दुपारी बारानंतर वातावरणात अचानक बदल झाला आणि जोरदार पावसाने हजेरी लावली . अर्ध्या ते पाऊण तास झालेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते . अनेकांकडे छत्री व रेनकोट मिळेल नसल्यामुळे त्याना त्याठिकाणी आसरा घ्यावा लागला बाजारपेठेतील दुकानदारांची आणि रस्त्यावरील पथारी , टपरी , भाजी विक्रेत्यांची सामानाची आवराआवर करताना तारांबळ उडाली होती . काही ठिकाणी तात्पुरती केलेली रस्त्याच्या डागडुजीची पुन्हा पावसाने पोलखोल केल्याचे दिसून आले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *