मराठी भाषा पंधरवडा चे उदघाटन…महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड चा उपक्रम…

रोहित खर्गे
पुणे विभागीय संपादक

गझलेच्या दोन ओळीतून अभिव्यक्ती साकार होत असते. गझल म्हणजे निबंध किंवा भाषण नव्हे. थोड्या शब्दात  मार्मिक आशय व्यक्त होणे हे प्रभावी गझलेचे लक्षण आहे. गझल ही नियमबद्ध असावी तसेच ह्रदयाशी संवाद  करणारी  असावी असे प्रतिपादन पुणे विद्यापीठ च्या मराठी  विभागाचे माजी प्रमुख गझलकार डॉ .अविनाश सांगोलेकर यांनी मराठी भाषा पंधरवडा च्या उदघाटन प्रसंगी केले. 

महाराष्ट्र साहीत्य परिषद पिं. चिं. आयोजित १४ जानेवारी ते २८ जानेवारी या दरम्यान संपन्न होणार्या मराठी  भाषा पंधरवडा चे उदघाटन सांगोलेकर यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी डॉ. राजेंद्र कांकरिया , महाराष्ट्र  साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे कार्याध्यक्ष विनीता ऐनापुरे उपस्थित होते.


      सदर कार्यक्रमात प्रथम महाराष्ट्र तसेच इतर राज्यातील ऑनलाइन कविता वाचन स्पर्धेत सहभागी झालेल्या बालकवींचा ” झेप फुलपाखरांची ” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. आणि  ” गझलेमधील मराठी भाषेची नजाकत ” या विषयावर डॉ. सांगोलेकरांचे व्याख्यान झाले. यावेळी स्थनिक गझलकार रघुनाथ पाटील प्रशांत पोरे, अभिजित पाटील  यांच्या गझलांमधील द्विपदीचा त्यानी उल्लेख केला.
   सदर कार्यक्रमास मकरंद बापट , पोलीस निरिक्षक कवी मोहन जाधव,  बाबू डिसोझा, माधुरी मंगरूळकर, मंगला पाटसकर , माधुरी डिसोझा, धनंजय भिसे, जयश्री श्रीखंडे, श्रीपाद सटवे , डॉ रजनी शेठ आणि  इतर उपस्थित होते.
राजन लाखे यानी प्रास्ताविक केले तर विनीता ऐनापुरे यानी आभार मानले.
जालिंदर राऊत यांनी सुत्रसंचालन  केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *