रांका ज्वेलर्स येथे ” सन्मान नवदुर्गेचा जागर स्त्री शक्तीचा ” हा विशेष उपक्रम
पिंपरी चिंचवड
२९ सप्टेंबर २०२२
26 सप्टेबर पासुन सर्वत्र सध्या नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे, मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सणसभारंभा मध्ये एक प्रकारची मरगळ दिसत होती,परंतु करोनाचे नियम शिथिल झाल्यामुळे यावर्षी एक प्रकारचे चैतन्य समाजातील सर्वच घटकांमध्ये दिसून येत आहे.
समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा रांका ज्वेलर्स कडून सन्मान
नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने चिंचवड येथील रांका ज्वेलर्स यांच्या वतीने “सन्मान नवदुर्गेचा जागर स्त्रीशक्तीचा” या विशेष उपक्रमांतर्गत नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जात आहे. रांका ज्वेलर्सच्या वतीने त्यांचा दालनात असलेले नवनवीन डिजाईन चे “ब्रायडल कलेक्शन” चे दागिने घालून उपस्थित महिलांचे फोटोशूट करण्यात येत आहे.
नेहमीच्या धावपळीच्या जीवनातुन स्वतः साठी थोडा वेळ काढुन असे फोटोशुट करण्याची संधी रांका ज्वेलर्स यांनी महिलांनी दिली त्याबद्दल सर्व महिलांनी रांका ज्वेलर्स यांचे आभार मानले. तसेच या उपक्रमात सहभागी होण्याची संधी आपला आवाज आपली सखी च्या संचालिका संगिता तरडे यांनी दिली,त्याबद्दल सर्वांनी त्यांना धन्यवाद दिले. दिनांक 28 सप्टेंबर 2022 रोजी नवरात्रीच्या तिसऱ्या माळेचे औचित्य साधुन सर्व महिला वकील यांनी निळ्या रंगाची साडी व ड्रेस परीधान केले होते.
पिंपरी चिंचवड शहरातील महिला वकिलांना प्रमुख पाहुणे नीता ढमाले,संस्थापक अध्यक्षा नंदादीप प्रतिष्ठाण, व नीता बारणे सामाजिक कार्यकर्त्या यांच्या हस्ते “सन्मान नवदुर्गेचा जागर स्त्रीशक्तीचा” या विशेष सन्मानाने सन्मानित करण्यात आले.