सरकार विरुद्ध बोलणं ही काय अतिरेकी कारवाई झाली की काय? – जितेंद्र आव्हाड

२४ डिसेंबर २०२२


राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंद परांजपे यांनी ट्विटरला एक व्हिडीओ ट्वीट केला होता. यानंतर शिंदे गटाकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.आनंद परांजपे यांनी केलेले ट्वीट आणि दिलेल्या घोषणा याचे कारण देत अनेक पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रातोरात ते दखलपात्र करण्याचे आदेशही पोलिसांना देण्यात आलेले आहेत,असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

हे सरकार सरकारपेक्षा एखाद्या गँगस्टरसारखे वागत आहे. विरोधक विरोध करणार हे लोकशाहीत अभिप्रेत असतं. असे अटक करून आणि धमक्या देऊन काही होतं नसतं, असं आव्हाड म्हणाले आहेत. असंही आव्हाड म्हणाले आहेत. माझ्यावरही खोट्या गुन्ह्याची तयारी सुरु केली असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.

८ पोलीस स्टेशनमध्ये आनंद परांजपे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल. म्हणजे सरकार विरुद्ध बोलणं ही काय अतिरेकी कारवाई झाली कि काय? ब्रिटिश विरोधकांचा आवाज बंद नाही करू शकले. तर अशा गुन्ह्यांनी लोकांचे आवाज कसे शांत करणार. विरोध तर होणारच आणि विरोध तर करणारच. असंही आव्हाड म्हणाले आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *