जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात जोरदार पाऊस : बांगरवाडीत पाच पुलांचा भरावा गेला वाहून

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
०२ सप्टेंबर २०२२

बेल्हे


बुधवार (दि.३१) रोजी सायंकाळी सात ते रात्री एक वाजेपर्यंत जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात जोरदार वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले असून बांगरवाडी येथील पाच पुलाचा भराव गेला आहे.

बांगरवाडी (ता जुन्नर) येथील गन विहीर पूल, स्मशानभूमी परसरातील पूल, पालखी मार्गावरील पूल, बांगरमळा येथील पूल, बारटका रोड येथील पूल अशा पाच फुलांचा भराव व रस्ता वाहून गेला आहे. या परिसरात जोरदार झालेल्या पावसामुळे प्रचंड प्रमाणात ओढ्यांना पाण्याचा प्रवाह अचानक वाढला. त्यामुळे पूलाचा भरावा मोठ्या प्रमाणात वाहून गेला. गावात यात्रा उत्सव सुरू असल्याने ग्रामपंचायतीकडून तात्काळ एक-दोन ठिकाणी मुरूम टाकून जाण्या येण्यापूरता रस्ता तयार केला आहे.

बेल्हे येथून बांगरवाडीला जाणाऱ्या रस्त्यावरील गणविहीर येथील पूल मोरीपुल आहे.या ठिकाणी तीन डोंगराचे पाणी एकत्र येतं त्यामुळे या ठिकाणी प्रचंड प्राणी प्रवाह असतो. त्यामुळे येथील वारंवार पुलाचा भरावा वाहून जातो.हा व बांगरमळा येथील पूल साकव पूल होणे गरजेचे आहेत. तसेच जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तातडीने पंचनामे करण्याची प्रशासनाला विनंती आहे – जालिंदर बांगर,सरपंच बांगरवाडी


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *