नारायणगाव विकास सोसायटीच्या ८३ व्या वार्षिक सर्व साधारण सभेत सभासदांना १०% लाभांश देण्याची घोषणा

०२ सप्टेंबर २०२२
नारायणगांव


नारायणगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादित या संस्थेची ८३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नारायणगाव येथील श्री मुक्ताई मंगल कार्यालयामध्ये खेळीमेळीच्या वातावरणात नुकतीच पार पडली. याप्रसंगी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व बाजार समितीचे सभापती संजय काळे तसेच विघ्नहरचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेच्या शेतकरी सभासदांना १०% लाभांश वाटप करण्याचे सर्वानुमते जाहीर करण्यात आले . सभेप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संतोषनाना खैरे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा सादर केला केला. सर्व सभासद शेतकऱ्यांचे व प्रमुख अतिथींचे स्वागत उपाध्यक्ष किरण वाजगे यांनी केले.

सभापती संजय काळे चेअरमन सत्यशील शेरकर यांची उपस्थिती

संस्थेचे अध्यक्ष संतोष नाना खैरे म्हणाले की, संस्थेचे सन २०२१ – २२ अहवाल सालात २५४६ सभासद असुन वसुल भागभांडवल २ कोटी ३४ लक्ष आहे. गुंतवणुक ३ कोटी १५ लक्ष आहे. चालु खरिप हंगामात संस्थेने ११५० सभासदांना (क्षेत्र – १०२४ हेक्‍टर साठी) १३ कोटी ५० लाखाचे पिककर्ज वाटप केले आहे. तसेच मध्यमुदत आणि दिर्घमुदत कर्जाचे वाटप सभासदांच्या मागणी प्रमाणे देण्यात येत आहे .एकुण २६ कोटी कर्ज वाटप करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा जोतिबा फ़ुले शेतकरी कर्ज मुक्ति योजने अंतर्गत संस्थेच्या ४०६ सभासदांना २ कोटी ८५ लाख रूपये रकमेचा कर्जमाफ़ी चा लाभ मिळाला आहे.

सन २०१७ -१८ , २०१८ – १९, २०१९ – २० या वर्षात नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम रुपये ५० हजार देण्याचे जाहिर केले आहे. त्यासंदर्भात संस्थेच्या ११५१ सभासदांची माहिती संस्थेने राज्यशासनाकडे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून दिली आहे. तसेच मागील हंगामा मध्ये राज्यशासनाने शेतकऱ्यांकडून खरिप कर्जाचे व्याज वसुल केले आहे. या व्याज परताव्याचा ९३३ सभासदांचा सुमारे ५० लाख रूपये रकमेचा प्रस्ताव राज्यशासनाकडे सादर केला आहे. त्या व्याजाच्या रक्कमा लवकरच सभासदांच्या बँक बचत खात्यात जमा होतील . येत्या काही काळात ऑनलाइन डिजीटल ७-१२, ८अ उतारे काढून देण्याची तसेच ई – पिकपाहणी करण्याची सुबिधा उपलब्ध केली जाणार आहे . तसेच भविष्य्काळात संस्थेच्या वतीने बहु उद्देशीय व्यापारी संकुल उभारुन विविध व्यवसाय उभारण्याचा संस्थेचा मानस असल्याचे अध्यक्ष संतोषनाना खैरे यांनी सांगितले. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकखरी बँकेचे संचालक संजयराव शिवाजीराव काळे यांच्या हस्ते संस्थेचे नवनिर्वाचीत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. त्यांनी संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. तालुक्यातील सर्वात अग्रेसर कर्जवाटप व वसुली अस्ल्याचे सांगून जिल्हा बँकेमार्फत शेतकऱ्यांना फक्त ८ % व्याजदराने फ्लॅट खरेदीसाठी ७५ लक्ष रुपये कर्ज देणार असल्याचेही श्री काळे यांनी जाहीर केले.

सभेप्रसंगी विघ्नहर सह.साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर यांनी संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. संस्थेस कर्ज वसुलीसाठी कारखान्यामार्फत मदत केली जाईल असे जाहीर केले. नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, कृषीरत्न ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिलतात्या मेहेर यांनी मनोगत व्यक्त केले . याप्रसंगी प्रकाश पाटे, पुणे जिल्हा मध्य. सह. बँकेच्या माजी उपाध्यक्षा राजश्री बोरकर, वारुळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर, नारायणगावचे माजी सरपंच अशोक पाटे, सदानंद खैरे, डी के भुजबळ, संतोष वाजगे, यशवंत पतसंस्थेचे अध्यक्ष महादेव वाघ, मुक्ताई देवस्थानचे अध्यक्ष एकनाथशेठ शेटे, रघुनाथ लेंडे, पुणे जिल्हा मध्य. सह. बँकेचे वरीष्ठ विभागीय अधिकारी सुभाष कवडे, बँकेचे वसुली आधिकारी सुनिल ताजणे, नारायणगांवचे तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी, वारुळ्वाडीचे तंटामुक्ती अध्यक्ष शिवदत्त संते, पत्रकार अतुल कांकरिया, सुरेश वाणी, अशफाक पटेल, रविंद्र कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते. सभेचे सुत्र संचालन संस्थेचे सचिव गणेश गाडेकर यांनी केले. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष किरण वाजगे यांनी आभार मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *