कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या घोडेगाव येथील महिलांना क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
५ जानेवारी २०२२

घोडेगाव


आंबेगाव तालुक्याची प्रशासकीय राजधानी असलेल्या घोडेगाव येथे सावित्रीबाई फुले जयंती व महिला मुक्ती दिनाचे औचित्य साधुन श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्ट घोडेगाव यांच्या वतीने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले भव्य पुरस्कार सोहळा सन २०२१ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोरोना महामारीच्या काळात तसेच आरोग्य, सांस्कृतिक,क्रिडा या क्षेत्रात उत्कृष्ट कागगिरी करणाऱ्या महिलांचा ट्रॉफी तसेच प्रशस्तिपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गुणगौवरव करण्यात आला.श्री शनैश्वर मंदिराच्या आवारात पुरस्कार सोहळा संपन्न झाला.

या प्रसंगी घोडेगावचे लोकनियुक्त आदर्श सरपंच क्रांती गाढवे,माजी सरपंच रुपाली झोडगे,महिला दक्षता समितीचे अध्यक्ष रत्ना गाडे , तिळवण तेली समाजाचे अध्यक्ष रविंद्र कर्पे,प्रांतिक तेली महासभा आंबेगाव तालुका अध्यक्ष वासुदेव कर्पे, भाजपाचे नेते मा.जिल्हा नियोजन समितीचे सदस्य भानुदासनाना काळे , पंचायत समिती सदस्य अलकाताई घोडेकर ,काळेवाडी दरेकरवाडीचे सरपंच मंजुषा बोऱ्हाडे, मानवधिकार हक्क पुणे जिल्हाचे अध्यक्ष ज्योती घोडेकर,माजी राष्ट्रवादी -काँग्रेस घोडेगाव शहर अध्यक्ष माधवी कर्पे, श्री हरिश्चंद्र महादेव देवस्थानचे कार्याध्यक्ष प्रशांत काळे,घोडेगावचे कार्यक्षम ग्रामपंचायत सदस्य गणेश घोडेकर,खंडुशेठ खंडागळे , दिपक घोडेकर,राजश्री काळे आदी मान्यवार सह स्थानिक ग्रामस्त तसेच श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे सभासद उपस्थित होते.

या प्रसंगी कोरोना योद्धा पुरस्कार देण्यात आलेल्या महिलांची नावे पुढील प्रमाणे स्त्री रोग तज्ञ डॉ. ऋतुजा घोलप,प्रसिद्ध उदयोजिका समाजसेविका वैशाली गांधी , परांडा शाळेचे मुख्याध्यापिका आर्दश शिक्षिका अंजुषा राऊळ, कोविड सेंटर येथे फार्मासिस्टचे उत्कृष्ट कामगिरी अक्षदा मंडलिक,ऑनलाईन क्लासचे प्रशिक्षण डान्स टिचर नेहा नांगरे, अंगवाडी सेविका हेमा घोडेकर, ग्रामिण रुग्णालयातील अधिपरिचारिका स्वाती तपस्वी ,आशा वर्कर कविता परदेशी, ग्रामपंचायत कर्मचारी लता दहितुले तसेच नंदा बोऱ्हाडे,मंदीराची सर्व व्यवस्था व स्वच्छताचे कार्य मोहिनी बागलानी अदि महिलांचा सन्मान करण्यात आला.

 


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *